Riteish Deshmukh : ‘… हे एक समर्पण आहे’; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसाठी रितेशची खास पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची प्रचंड चर्चा आहे. हा प्री- वेडिंग सोहळा एखादा भव्य समारंभ असल्यासारखाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.

यामध्ये बॉलीवूडच्या तसेच हॉलीवुडच्या सिने कलाकारांचा देखील समावेश आहे. दरम्यान, या प्री- वेडिंग सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास सोहळ्यात महाराष्ट्राचे लाडके कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील हजर होते.

या प्री- वेडिंग सोहळ्यानंतर रितेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसते आहे. (Riteish Deshmukh) अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या कपलचा प्री-वेडिंग सोहळ्यातील एक खास ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने या कपलचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. तसेच रितेश- जिनिलिया आणि अनंत अंबानी यांच्या भेटीचा व्हिडिओ देखील यामध्ये पहायला मिळतोय.

रितेश देशमुखची पोस्ट (Riteish Deshmukh)

यासोबत रितेशने कॅप्शनमध्ये अनंत- राधिका या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना लिहिले आहे की, ‘प्रेमात अखंड बुडालेल्या आणि एकमेकांचे होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेल्या या जोडप्याच्या प्रेम आणि आनंदाने भरलेल्या या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. राधिका, तुझं हास्य तुझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. ते अशा सौंदर्याने चमकते जे बघणाऱ्याला प्रभावित करते. तुझे पुढील सर्व दिवस तुझ्या तेजस्वी हसूप्रमाणे आनंद आणि आशीर्वादाने भरलेले असुदे’.

पुढे लिहिलंय, ‘अनंत, तुझं हृदय समुद्रासारखं विशाल आहे. तुझं वनताराचं स्वप्न हे केवळ प्रेरणादायीच नव्हे तर वन्य प्राण्यांसाठी असलेले एक समपर्ण आहे. तू ज्याप्रमाणे तुझे कुटुंबीय, भावंडे आणि राधिकाबरोबर बोलतोस ते पाहणे फारच हृदयस्पर्शी आहे. तुमच्या या सुंदर प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून तुमचे अभिनंदन. तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले राहो आणि तुमच्या या गोड नात्यात प्रेमाचा दिवा उजळून तुम्ही अनंत काळासाठी असेच सुखी एकत्र राहो’. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (Riteish Deshmukh)