हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Riteish Genelia Funny Video) बॉलीवूड तसेच मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लाडकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा देशमुख. दोघांचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतो. रितेश आणि जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि एकमेकांसोबत मजेशीर रील्स बनवताना दिसतात. आताही त्यांनी असाच एक रील व्हिडीओ बनवला आहे. जो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ (Riteish Genelia Funny Video)
या व्हिडिओत जिनिलिया रितेशला विचारते की, ‘लग्नाच्या आधी तर तू अनेकदा आय लव्ह यू , आय लव्ह यू बोलायचास. मग आता का नाही बोलत?’ तर यावर रितेश तिला उत्तर देताना म्हणतो की, ‘निवडणूक संपली, प्रचार संपला’.
या मजेशीर व्हिडीओसोबत अभिनेता रितेश देशमुखने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘बेबी हीच आहे योग्य निवड; जा मतदान करा’. मतदानाच्या पार्श्वभूमीवरील रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, ‘विधानसभा प्रचार चालू होतोय’. (Riteish Genelia Funny Video) तर अन्य एकाने लिहिलं, ‘तुम्ही दोघांनी तर सगळ्या पॉलिटिकल पक्षांचं भांड फोडलं’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे की, ‘मग तर हे सरकार फक्त पाच वर्ष चालेल’. अन्य एका नेटकाऱ्याने म्हटलं आहे की, ‘भावा, सावधान राहा. कारण- मतदान दर पाच वर्षांनी होतं. सरकार बदलू शकतं’.
माहितीनुसार, रितेश आणि जिनिलिया यांनी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला आहे. यासाठी ते कुटुंबासोबत लातूरला गेले होते. लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर रितेश, जिनिलिया आणि रितेशची आई वैशाली देशमुख यांनी मतदान केले. (Riteish Genelia Funny Video) रितेश देशमुखचे वडील आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.