हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rituraj Singh) टीव्ही मनोरंजन जगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. विविध हिंदी मालिका तसेच अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. लोकप्रिय मालिका अनुपमा मध्ये महत्वाची भूमिका साकारत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे.
अभिनेते ऋतुराज सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरताच चाहते दुःख व्यक्त करू लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते ऋतुराज सिंग याना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. (Rituraj Singh) त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनुपमा मालिकेतील कलाकरांना आणि चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि चाहते सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करून ऋतुराज सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
एका वृत्तानुसार, ऋतुराज हे गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. या आजारावरील उपचारासाठी ते काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाले होते. (Rituraj Singh) त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊन ते घरीसुद्धा परतले. मात्र त्यानंतर सोमवारी, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री त्यांना हृदय विकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की त्यामुळे ऋतुराज यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे.
(Rituraj Singh) ऋतुराज यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं, ‘होय. ऋतुराजचे तीव्र हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. त्यांना स्वादुपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले’.
अभिनेते ऋतुराज सिंग यांनी ‘अपनी बात’, ‘ज्योति’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट और अदालत’, ‘दीया और बाती हम’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मालिकांशिवाय त्यांनी काही (Rituraj Singh) सिनेमांमध्येदेखील काम केले होते. विविध ढंगाच्या भूमिकांमधून त्यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा होता. त्यामुळे ऋतुराज यांच्या निधनाची बातमी समोर येताच कला जगताला मोठा धक्का लागला आहे.