हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्याकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्ट-अपने रिव्हरने (river indie) आपली रिव्हर इंडी नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या गाडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचा हटके लूक आणि डिझाईन… आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.
लूक आणि डिझाईन –
इतर स्कुटर पेक्षा या स्कुटरला वेगळेपण प्राप्त होणारी गोष्ट म्हणजे हीचा अनोखा लूक आणि डिझाईन… यामुळे बघताक्षणीच तुम्ही या इलेक्ट्रिक स्कुटरच्या प्रेमात पडाल. तसेच ऐसपैस जागा असल्याने चालवायला सुद्धा ही गाडी एकदम आरामशीर वाटते. या इंडी ई-स्कूटर 43-लिटर बूट स्पेस आणि 12-लीटर ग्लोव्ह बॉक्स स्पेससह एकूण 55-लिटर जागा मिळत आहे. तसेच मागे आणि पुढे 14 इंची मोठी चाके मिळतात . समोरील बाजूस डबल हेडलॅम्प देण्यात आले आहेत त्याकडे मुख्यत्वे सर्वांचे लक्ष्य जात आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सस्पेन्शनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, ट्विन रियर हायड्रॉलिक सस्पेंशन आणि टेलिस्कोपिक फ्रंट वापरण्यात आला आहे.
120 किमी रेंज –
या ई-स्कूटरमध्ये 4 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह 6.7 kW पॉवरची इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. ही बॅटरी 5 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो. एकदा फुल्ल चार्जिंग केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 120 किलोमीटर पर्यंत अंतर पार करते. हीचा टॉप स्पीड ९० किलोमीटर प्रतितास असून अवघ्या 3.9 सेकंदात ही इलेक्ट्रिक स्कुटर 40 किमी/प्रतितास वेग वाढवू शकते. स्कुटरला इको, राइड आणि रश असे तीन राइडिंग मोड दिले आहेत.
किंमत किती –
गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कुटर 1.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च केली आहे. कंपनी या स्कूटरच्या ऑर्डर बुकिंगला सुद्धा सुरुवात केली असून कंपनी या गाडीची डिलिव्हरी ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करू शकते.