500 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

Rivot NX100 Electric Scooter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये भारतात विविध व्हेरीयंट असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांचा या इलेक्ट्रिक स्कूटरला उस्फुर्त प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये EV सेक्टर तेजीत येणार आहे. बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होत आहेत. याच पार्शवभूमीवर Rivot Motors मार्केटमध्ये Rivot NX100 नावाची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करीत आहे. या स्कुटरचे खास वैशिष्टये म्हणजे ती तब्बल 500 KM रेंज देतेय. आणि महत्वाचे म्हणजे Ola, Ather पेक्षा या स्कुटरची किंमतही स्वस्त आहे.

Rivot Motors कंपनीने विविध शक्तीशाली व्हेरीयंट लॉन्च केले आहेत. क्लासिक, प्रीमियम, एलिट, स्पोर्ट्स आणि ऑफलँडर असे ते 5 पॉवरफुल व्हेरियंट आहेत. EV क्षेत्रात स्प्लॅश करण्यासाठी हे व्हेरीयंट तयार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिझाईन आकर्षक अशी असून त्यामुळे गाडीचा लूक चांगलाच उठून दिसतोय. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये 4.2kW बॅटरी पॅक देण्यात आला असून ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ लागतो.

Rivot NX100 ही इलेक्ट्रिक स्कुटर कंपनीने विविध व्हेरियंटसह वेगवेगळ्या रेंजसह लॉन्च केली आहे. यातील क्लासिक व्हेरियंटमध्ये 100 किलोमीटर रेंज ग्राहकांना दिली आहे, तर प्रीमियम आणि एलिट स्पोर्टमध्ये ग्राहकांना 200 किमीपर्यंतची रेंज मिळेल. ऑफलेंडर व्हेरियंटची रेंज 300 किलोमीटरपर्यंत आहे आणि अतिरिक्त बॅटरी पॅकसह, ती 200 किलोमीटर अधिक धावू शकते. म्हणजेच एकाच वेळी ग्राहक 500 किलोमीटरचा प्रवास सहजपणे करू शकतील एवढी या इलेक्ट्रिक स्कूटरची ताकद आहे. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीने एक्स्ट्रा बॅटरीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे.

फक्त 499 रुपयांमध्ये बकिंग

Rivot Motors कंपनीची Rivot NX100 इलेक्ट्रिक स्कूटर बुक करायची असेल तर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच वेबसाइटवर जाऊन बुक करू शकता. त्यासाठी ग्राहकांनी ₹ 499 चे टोकन ऑनलाईन भरून स्कूटर बुक करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहकांना विविध स्कूटर्सबद्दल इत्यंभूत माहिती आणि स्मार्ट फीचर्सचे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल.