हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दाऊद इब्राहिम याचा जवळचा कथित सहकारी रियाज भाटी याची पत्नी रेहनुमा भाटी यांनी मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाणे येथे बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रार नोंदवली आहे. पतीनेच आपल्याला त्याचे व्यवाससायकि सहकारी आणि इतर उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. रियाझ भाटी, मुनाफ पटेल, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या आणि पृथ्वीराज कोठारी यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे.
बलात्कारासारखे गंभीर आरोप असूनही पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नाही, असा आरोप रियाझच्या पत्नीने केला आहे. तक्रारीत रियाझच्या पत्नीने स्पष्टपणे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मुनाफ पटेल यांचे नाव घेतले आहे, तर राजीव शुक्ला हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष आहेत. फिर्यादीत पृथ्वीराज कोठारी नावाच्या व्यक्तीची ओळख देण्यात आलेली नाही. मात्र, एका मीडिया चॅनलशी संवाद साधताना महिलेने सांगितले की, ही व्यक्ती एक प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आहे.
Rehnuma Bhati,wife of Riyaz Bhati(alleged close aide of Dawood Ibrahim) registered complaint at Mumbai's Santacruz PS on Sept 24 alleging rape-molestation by Riyaz Bhati,Munaf Patel,Rajeev Shukla,Hardik Pandya&Prithviraj Kothari. Police verifying allegations,no FIR registered yet
— ANI (@ANI) November 12, 2021
रेहनुमा हिने तरियाझ भाटीवर त्याचे मित्र, व्यावसायिक सहकारी आणि इतर हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील केला आहे. तिने नकार दिल्यास दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे.
तिने म्हटले आहे की, 2011-2012 मध्ये कोठारीसोबत, 2014-15 मध्ये पटेल यांच्यासोबत आणि पंड्या आणि त्याचे दोन मित्र यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पंड्या आणि त्याच्या मित्रांनी दारू आणि ड्रग्सच्या प्रभावाखाली अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे