मोदींचे ‘ते’ ट्विट अन इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष बाहेर?

RLD with BJP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) भाजपप्रणीत इंडिया आघाडी (INDIA Alliance) विरोधात देशभरातील विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र जस जस निवडणूक जवळ येत आहे तस तस इंडिया आघाडीतील पक्षामधील मतभेत समोर येत आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आणि दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला. तर नितीशकुमार थेट भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. त्यातच आता उत्तरप्रदेशातील आरएलडी पार्टी सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या चर्चाना जोर आलाय. याचे कारण ठरलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आजचे एक ट्विट ….

मोदींनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. चौधरी चरणसिंग हे आरएलडी (RLD) प्रमुख जयंत चौधरी यांचे आजोबा आहेत. त्यामुळे आपल्या आजोबांचा मोदींनी केलेला सन्मान पाहून जयंत चौधरी भावुक झाले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. येव्हडच नव्हे तर आता भाजपशी हातमिळवणी करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ‘आता मी नकार कसा देऊ?’ असे सूचक उत्तर जयंत चौधरी (Jayant Chaudhari) यांनी दिले. त्यामुळे जयंत चौधरी यांच्या आरएलडी ची भाजपसोबत युतीची चर्चा जोर धरू लागली आहे.

जयंत चौधरी नेमकं काय म्हणाले-

मोदी सरकार कडून माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर जयंत चौधरी अत्यंत भावुक झाले. आजचा दिवस देशासाठी मोठा आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींचे आभार मानतो. मोदींना देशाची नाडी कळते. आज कामगार, शेतकरी, मजूर यांचा सन्मान केला जात आहे. इतर कोणत्याही सरकारमध्ये हे करण्याची क्षमता नव्हती असं म्हणत त्यांनी मोदींचे कौतुक केलं. मला आज माझ्या वडिलांची अजित सिंह यांची आठवण येतेय. आता भाजपला मी नकार कस देणार?? मी किती जागा घेईन यावर लक्ष्य देण्याची आता गरज नाही असं म्हणत त्यांनी भाजपसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले.

मोदींचे ट्विट काय??

देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे असं ट्विट करत मोदींनी चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली.