मुंबई ते रत्नागिरी फक्त 3 तासांत; 1 सप्टेंबरपासून सुरु होणार रो-रो सेवा

RO RO Ferry Mumbai To konkan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत 1 सप्टेंबरपासून रोरो फेरी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात अवघ्या ३ तासांत जाणे शक्य होणार आहे. आधीच एकीकडे मुंबई गोवा महामार्गाची बिकट अवस्था आणि रेल्वेला असलेली मोठी गर्दी यामुळे कोकणवासीयांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं. परंतु आता नव्या रोरो सेवेमुळे आता कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल.

रस्तेमार्गाने मुंबईतून रत्नागिरीला किंवा सिंधुदुर्गला पोहोचण्यासाठी 10 ते 12 तास लागतात. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यानंतर आता फक्त 3 ते ५ तासांत हा प्रवास पूर्ण होणार आहे. भाऊचा धक्का (फेरी घाट) ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशी रोरो (रोल-ऑन/रोल-ऑफ) फेरीमध्ये ६५६ प्रवासी, ५० चारचाकी आणि ३० दुचाकी बसतील. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात रोरोचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रकल्पासाठी आम्हाला डीजी शिपिंग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या केंद्रीय संस्थांकडून १४७ परवानग्या मिळाल्या आहेत,” असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

कोणत्या गाडीला किती खर्च ?

एम२एम प्रिन्सेस या फेरीचे भाडे इकॉनॉमीसाठी २,५०० रुपये, प्रीमियम इकॉनॉमीसाठी ४,००० रुपये, बिझनेस क्लाससाठी ७,५०० रुपये आणि फर्स्ट क्लाससाठी ९,००० रुपये असेल. चारचाकी वाहनासाठी ६,००० रुपये, दुचाकीसाठी १,००० रुपये आणि सायकलसाठी ६०० रुपये आकारले जातील. मिनीबससाठी १३,००० रुपये, ३० आसनी बससाठी १४,५०० रुपये, ४५ आसनी बससाठी १७,००० रुपये आणि मोठ्या बससाठी २१,००० रुपये शुल्क आकारले जाईल. ही फेरी २५ नॉट्सच्या वेगाने प्रवास करेल आणि देशातील सर्वात वेगवान प्रवासी फेरींपैकी एक असेल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. सुरुवातीला ही सेवा रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील विजयदुर्ग इथपर्यंत असेल.

वेळापत्रक कसे असेल?

हि रोरो फेरी मुंबईहून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि 11 वाजता पोहोचेल. यानंतर अर्धा तास थांबून दुपारी ही रो-रो दीड वाजता विजयदुर्गला पोहोचेल. यानंतर दुपारी अडीच वाजता विजयदुर्गहून पुन्हा एकदा ती परतीच्या प्रवासात मुंबईच्या दिशेने रात्री नऊ वाजता पुन्हा मुंबईला पोहोचेल. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रोरो फेरी सेवा ३० वर्षांहून अधिक काळानंतर कोकणात परतणार आहे असं नितेश राणे यांनी म्हंटल.