Road Trips In Monsoon : लोणावळ्याच्या टेकड्या ते आंबोली धबधबा….; पावसाळ्यात 5 निसर्गरम्य रोड ट्रिप

Road Trips In Monsoon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Road Trips In Monsoon । महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन यंदा लवकर झालं असून अनेक भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पावसाळा आला कि, त्याचा आनंद घ्यावा… कोसळल्या सरीत निसर्गाच्या सानिध्यात जावं, मनमोहन निसर्गाचा आस्वाद घ्यावं असं प्रत्येकालाच वाटत.. पावसाळ्यात खास करून धबधबे पाहण्याचा, त्याचा आनंद घेण्याचा मोह अनेकांना असतो… पण हे पर्यटन करत असताना त्याठिकाणी जाण येणं सोप्प असावं, मुख्य म्हणजे रस्ता सोप्पा असावा हि काळाची गरज आहे… त्यामुळेही तुम्ही अगदी सहज जाऊ शकेल असं निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ५ पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी तुम्ही मनसोक्त ट्रिप काढू शकता, निसर्गाचा खराखुरा आनंद एन्जॉय करू शकता.

१) आंबोली धबधबा:

आंबोली धबधबा हे निसर्ग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात आहे…. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा धबधबा, पावसाळ्यात विशेष आकर्षक दिसतो, कारण मुसळधार पावसामुळे याठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढतो. हिरवीगार जंगले, धुके, डोंगररांगा आणि धबधबा यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण पर्वणी आहे. परिसरातील आंबोली, गेळे आणि चौकुळ ही तीन गावे नयनरम्य निसर्गसौंदर्य, घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेसाठी पर्यटकांची पसंतीची ठिकाणे आहेत. दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसह देशभरातून लाखो पर्यटक आंबोलीचा पाऊस, धुके आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. पावसाळ्यातील पहिले दोन-तीन महिने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते.

2) पाचगणी-महाबळेश्वर- Road Trips In Monsoon

पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दोन लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. निसर्गसौंदर्य, हिरवीगार जंगले, धबधबे, यामुळे पावसाळ्यात आणि खास करून जून- जुलै महिन्यात याठिकाणी पर्यटकांचा मोठा लोंढा असतो. पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर, पावसाळ्यात रौद्ररूप धारण करणारा लिंगमळा धबधबा आहे. पाचगणी-महाबळेश्वर रस्त्यावर, पुस्तकांचे गाव भिलारजवळ भिलार धबधबा आहे. याशिवाय, वेण्णा तलाव, आर्थर सीट पॉइंट, एलिफंट पॉइंट, मंकी पॉइंट:विल्सन पॉइंट (सनराइज पॉइंट) आणि सनसेट पॉइंट, मॅप्रो गार्डन यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता. रस्ते मार्गे (Road Trips In Monsoon) जायच असल्यास, पुणे (120 किमी), मुंबई (245-285 किमी), सातारा (50 किमी) बस आणि टॅक्सी उपलब्ध आहे.

3) माळशेज घाट

पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर तुम्हाला माळशेज घाट दिसेल. हे ठिकाण त्याच्या उंच कडा, सकाळचे धुके आणि भरपूर वन्यजीवांमुळे मन मोहून टाकते. विशेषतः पावसाळ्यात इथल्या निसर्गाला सुंदर रूप येत. येथील घनदाट जंगल, भव्य डोंगर रांगा, आणि विस्तीर्ण शेतजमीन पर्यटकांच्या मनाला आकर्षित करतात. पुणे शहरापासून माळशेज घाट साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी शेकडो स्थलांतरित पक्षी पर्वत शिखरांजवळ एकत्र येतात आणि पक्षी निरीक्षकांसाठी हे ठिकाण आकर्षक बनवते. पिंपळगाव जोगा धरण आणि त्याच्या लगतच्या धबधब्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी असते.

4) लोणावळा-खंडाळा-

लोणावळा आणि खंडाळा हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील दोन लोकप्रिय अशी हिल स्टेशन्स आहेत. पावसाळ्यात (Monsoon Tourist Places Near Pune) हिरवीगार झाडी, धबधबे आणि धुक्याने हे हिल स्टेशन नटलेले असतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर असलेलं हे ठिकाण पावसाळी सहलीसाठी सर्वात जास्त लोकप्रिय मानलं जाते. याठिकाणी भुशी डॅम, टायगर्स लिप, राजमाची पॉइंट, लोणावळा तलाव यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आहेत. पावसाळ्यात धबधब्यासारखा वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि आसपासची हिरवळ यामुळे भुशी डॅम हा पर्यटकांचा आवडता स्पॉट ठरतो. टायगर्स लिप डोंगराच्या टोकावरून खंडाळ्याच्या घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. तर पावसाळ्यात लोणावळा तलावाभोवतीचा परिसर अत्यंत रमणीय दिसतो. धबधबे, धुके आणि थंड हवामान यामुळे लोणावळा खंडाळ्याच्या निसर्गाचा अनुभव अविस्मरणीय होतो. Road Trips In Monsoon

5)ताम्हिणी घाट

सुंदर लँडस्केप्सची आवड असलेल्या लोकांसाठी निसर्गरम्य ताम्हिणी घाट हा एक मस्त पर्यटन स्पॉट आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यात हे धबधबे पूर्ण बहरात असतात.. याठिकाणी आल्यानंतर पर्यटकांनी नेहमीच टेमघर धरण आणि त्याच्या जवळच्या धबधब्याच्या दृश्यांचे छायाचित्र घेण्यासाठी त्यांचे कॅमेरे तयार ठेवावेत.