Robbery on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दगडफेक अन लूटमार!! Video पाहून धडकी भरेल

Robbery on Samruddhi Highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Robbery on Samruddhi Highway। मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर अंतराला जोडणारा समृद्धी महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी गेमचेंजर ठरत असला तरी याच महामार्गावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. यापूर्वी काही प्रवाशांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. विशेष म्हणजे रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विट मध्ये दगडफेकीचे व्हिडिओही शेअर केले आहेत.

रोहित खडसे यांनी ट्विट करत म्हंटल, आमचे @Liberal_India1 यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. समृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या (Robbery on Samruddhi Highway) घटना घडत आहेत. या रस्त्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा आपत्कालीन सेवा नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. गृहमंत्री महोदय, कृपया यात लक्ष घाला ! आपल्या घराबाहेर जवळपास शंभर एक पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल, तुम्ही ज्या ताफ्यात असतात त्यात पन्नास एक पोलीस असतील. मग ज्या जनतेच्या आशीर्वादाने तुम्ही निवडून आलात त्यांना तुम्ही वाऱ्यावर का सोडले आहे ? ड्रीम प्रोजेक्ट म्हणून फक्त उद्घाटन करून मोकळे झालेले चालणार नाही, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.

यापूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या लुटमारीच्या घटना – Robbery on Samruddhi Highway

१) छत्रपती संभाजीनगरलगत कुटुंबाचे वाहन अडवून सोने लुटून मारहाण करण्यात आली होती.
२ ) वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनावर दगडफेक; त्यात एक जण जखमी.
३ ) नागपूर ते मुंबई मार्गावरील कारंजा गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर केली दगडफेक.
४ ) मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून रोख रक्कम व इतर साहित्य लुटले.
५)मुंबईकडे जात असलेल्या कुटुंबास मेहकरजवळ लुटले.