शेवटच्या मॅचनंतर फेडरर ढसाढसा रडला; पहा Emotional Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेनिसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याने लेवर कप मध्ये आपला शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली . यावेळी अत्यंत भावुक झालेला फेडरर ढसाढसा रडू लागला. 41 वर्षीय फेडररने शुक्रवारी आपला अखेरचा सामना खेळला. फेडररने स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल सोबत दुहेरीत सामना खेळला. या सामन्यात फेडरर- नदाल जोडीचा अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉकशीत यांच्याकडून ४-६, ७-६(२), ११-९ असा पराभव झाला. मॅच संपल्यानंतर फेडररने आपल्या कारकिर्दीचा निरोप घेतला.

आपल्या भाषणात फेडररने सर्वांचे आभार मानले. आजचा दिवस खरंच अविश्वसनीय होता. मी आनंदी आहे, मी दु:खी नाही. राफालसोबत एकाच टीममध्ये खेळणं, तसंच या सर्व श्रेष्ठ खेळाडूंसोबत, खेळणं खूपच छान आहे. अँडी, थॉमस, नोवोक, माटेओ, कॅम, स्टेफानोस, राफा, कॅस्पर आणि पूर्ण टीम… तुम्ही सगळे अफलातून आहात. लेव्हर कपमध्ये तुम्हा सगळ्यांसोबत खेळताना मजा आली असे फेडरर म्हणाला.

यावेळी त्याने आपली पत्नी आणि कुटुंबियांचेही आभार मानले. माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली. ती मला खूप आधी थांबवू शकली असती. पण तिनं तसं केलं नाही. तिने माझं खेळणं सुरू ठेवू दिलं, जगभर जाऊन खेळण्याची मुभा दिली असं म्हणत त्याने आपल्या पत्नीचे कौतुक केलं.

दरम्यान, रॉजर फेडरर टेनिसचा बादशहा म्हणून ओळखला जातो. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने टेनिस मध्ये पदार्पण केले. आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत फेडररने 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन , एकदा फ्रेंच ओपन , 8 वेळा विम्बल्डन आणि यूएस ओपन 5 वेळा जिंकली आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय फेडरर जवळपास 237 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता.