रोहित बनला मुंबई इंडियन्सच्या बसचा ड्रॉयव्हर; Video पाहून चाहते हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा आजघडीला देशातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. रोहित शर्माचा स्वभाव अतिशय गमतीशीर असून मैदानावर रोहितच्या सेन्स ऑफ ह्युमरची बरोबरी कोणीच करू शकत नाही. संघातील युवा खेळाडूंसोबत सुद्धा रोहितचे मस्ती करतानाचे विडिओ व्हायरल झाले होते. आता रोहितचा आणखी एक विडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो चक्क मुंबई इंडियन्सच्या बसचा ड्रॉयव्हर (Rohit MI Bus Driver) झालेला दिसत आहे. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून त्याचे चाहते हैराण झाले आहेत.

तुम्ही या व्हायरल विडिओ मध्ये पाहू शकता, कि मुंबई इंडियन्स टीमची बस मैदानाकडे निघाली होती, ज्यामध्ये टीमचे सर्व खेळाडू आणि कर्मचारी उपस्थित होते, तेव्हा रोहित शर्मा आला आणि ड्रायव्हरच्या सीटवर बसला. यावेळी त्याने ड्रायव्हिंग सीटवर बसण्यापूर्वी बससमोर उभ्या असलेल्या लोकांना दूर जाण्याची विनंती केली. यादरम्यान टीममेट आणि चाहत्यांनी सेल्फी सुद्धा काढले. आणि रोहितचा गमतीशीर अंदाज आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर केला. अलीकडेच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची जर्सी घालून रेंज रोव्हर चालवताना दिसला. रेंज रोव्हर व्यतिरिक्त रोहित शर्माच्या कार कलेक्शनमध्ये इतरही अनेक महागड्या गाड्या आहेत.

आज मुंबई चेन्नई सामना –

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानले जाणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर आज रात्री ७ :३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. वानखेडे स्टेडियम नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त मानले जाते त्यामुळे आजही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर लक्ष्य असेल तर दुसरीकडे रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार खेळ करावा अशी मुंबईच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.