हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महापालिका निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापायला लागलं आहे. सत्तास्थापनेपासून दूर राहण्याचं शल्य मनात असताना भाजपाने महापालिका निवडणुकीसाठी चांगली कंबर कसली आहे. अशातच यंदाच्या महापालिका निवडणुकीत मुख्य विरोधी असणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेते सोडताना दिसत नाही आहेत. तर भाजपच्या नेत्यांचा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यात महाविकास आघाडीचे नेते कोणतीही कसर बाकी ठेवतांना दिसत नाही आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ८ नाही, तर ६० नगरसेवक निवडून आणायचे, असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले होते. त्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपहासात्मक टीका ट्विटरवर केली होती. त्यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर शेलारांना चोख प्रत्युत्तर देत एक सल्ला दिला आहे.
”भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे. #आत्ता_तरी_सुधरा_राव, आशीष शेलारजी,” असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे. #आत्ता_तरी_सुधरा_राव @ShelarAshish https://t.co/aIMXaZEiSr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
नेमकं काय?, म्हणाले होते शेलार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ६० जिंकू असा दावा केला होता. त्यावरून आशिष शेलार यांनी अजित पवार यांना टोला ट्विटरवर टोला लगावला होता. “राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६०, तर दुसरे म्हणतात ५० जिंकू… आहेत त्या ८ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर.. विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, ” असं ट्विट शेलार यांनी केलं होतं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.