Rohit Pawar ED Enquiry : …. तेव्हा शरद पवारांनी ED लाच पेचात टाकलं होतं; रोहित पवार आजोबांचा कित्ता गिरवणार??

Rohit Pawar ED Enquiry sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rohit Pawar ED Enquiry । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची काल ED कडून तब्बल ११ तास कसून चौकशी करण्यात आली. बारामती ऍग्रो कंपनी प्रकरणी रोहित पवारांवर ED च्या अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. रात्री उशिरा रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले आणि आपण दिल्लीसमोर झुकणार नाही, आपण लढतच राहणार असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. रोहित पवारांच्या (Rohit Pawar) या आक्रमक बाण्यानंतर 2019 मध्ये त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या ईडी नोटीसची आठवण येते. आणि प्रश्न पडतो कि रोहित पवार सुद्धा आपल्या आजोबांचा कित्ता गिरवणार का??

शरद पवारांबाबत नेमकं काय घडलं होते-

खरं तर 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेतेमंडळी भाजपमध्ये उडी मारत होते, त्याच दरम्यान शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र चौकशी साठी (Sharad Pawar ED) बोलवलं नव्हते. परंतु पक्के राजकारणी असलेल्या मुरब्बी पवारांनी असा फास टाकला कि ED कार्यालयात न जाताच पवारांनी ईडीला धोबीपछाड दिला. जेव्हा एखाद्या नेत्याचे ED चौकशी साठी नाव येत तेव्हा तो पक्ष बदलतो किंवा काहीही कारणं सांगून चौकशी कशी टाळण्याचा प्रयत्न केला जातो, पण पवारांनी अचूक टाईमिंग साधत आपणच स्वतः ईडी ऑफिस मध्ये जाणार आहे असं जाहीर केलं आणि राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता खडबडून जागा झाला.

खरं तर ज्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Cooperative Bank) शरद पवार साधे संचालक सुद्धा नाहीत त्यामध्ये त्यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता सुद्धा संतापला होता, त्यातच शरद पवारांचे वय आणि त्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी सोडलेली पक्षाची साथ यामुळे शरद पवारांना जनतेकडून मोठी सहानभूती मिळू लागली होती. हीच गोष्ट हेरून पवारांनी थेट ईडीवरच डाव टाकला.

तो दिवस होता 27 सप्टेंबर 2019… दुपारी 2 वाजता आपण ईडी कार्यालयात जाणार आणि ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असं पवारांनी जाहीर केलं. त्यातच महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाशेजारीच ईडी चे ऑफिस आहे. शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून, अगदी खेड्यापाड्यातून राष्ट्रवादी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. संपूर्ण परिसर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेतेमंडीळीनी भरला होता अशावेळी नेमकं काय करायचे असा प्रश्न पोलिसाना पडला तर परिस्थितीला सामोरे जायचं तरी कस असा पेच ईडीला पडला. अखेर ईडीने माघार घेत आपली चौकशी होणार नाही आपण आमच्या कार्यालयात येऊ नका अशी विनंती शरद पवारांना केली. पवारांनी अगदी हुशारीने आणि मुत्सद्दी पणाने ईडीने टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटवला आणि जनतेकडून मिळालेल्या सहानुभूतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर जोरदार प्रचारसभा घेतल्या… राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आणले आणि राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करून दाखवले.

रोहित पवार आजोबांचा कित्ता गिरवणार?? Rohit Pawar ED Enquiry

आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेतेमंडळी बाहेर पडले आहेत. अशावेळी उद्याचा राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून समोर येण्याची संधी रोहित पवारांकडे आहे. त्यांच्याकडे शरद पवारांचा आशीर्वाद आणि राज्यातील लाखो युवकांचे समर्थन आहे. अशावेळी अत्यंत कमी काळात शरद पवार यांच्याप्रमाणेच राज्याच्या राजकारणात उभारी घेण्याची क्षमता रोहहित पवारांमध्ये आहे. त्यामुळे शरद पवारांप्रमाणेच रोहित पवार सुद्धा त्यांच्यावर आलेल्या ईडी चौकशीचा (Rohit Pawar ED Enquiry) डाव ईडी वर उलटून त्यांच्या पक्षाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभारी देण्यात यशस्वी होतात का हे पाहायला हवं.