सलूनचं उद्घाटन करुन रोहित पवारच बनले पहिले ग्राहक; फोटो Viral

0
183
Rohit Pawar Viral Photo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. राजकारणाचा घरातूनच वारसा लाभलेले रोहित पवार अजूनही सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून असतात. कधी एखाद्या प्रदर्शनात जाऊन ते युवकांसोबत गप्पाही मारतात तर कधी कार्यकर्त्यांसोबत. रोहित पवार यांनी नुकताच एक फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे. तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो म्हणजे त्यांनी शिंपोरा (ता. कर्जत) गावात गोपीनाथ वाघमारे यांनी सुरु केलेल्या सलूनचं उद्घाटन करत त्यांचे पवार हे पहिले ग्राहक झाले आहेत.

https://www.facebook.com/100044164193097/posts/549656309849837/

आमदार रोहित पवार यांचे सर्वसामान्यांसोबत असलेल्या आपुलकीच्या संबंध आहेत. त्यामुळे ते कधीही कोठेही सर्वांसोबत बसून गप्पा मारतात. त्यांनी नुकतेच एका सलूनचे उद्घाटन केले आहे. शिंपोरा (ता. कर्जत) गावात राहत असलेल्या गोपीनाथ वाघमारे यांनी एक सलून सुरु केले. त्या सलूनच्या उदघाटन कोणाच्या हस्ते करायचे असा त्यांच्या मनात प्रश्न पडला. यावेळी आपल्या जवळचा नेता म्हणून रोहित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे ठरवले. त्यांनी त्याबाबत पवार यांना कल्पनाही दिली. आणि विशेष म्हणजे रोहित पवार यांनी कशाचीही तमा न बाळगता थेट उदघाटन करण्यासाठी त्या सलूनवर पोहचले.

रोहित पवार यांना पाहताच उपस्थितही अवाक झाले. यावेळी रोहित पवार यांनी गोपीनाथ वाघमारे यांनी सुरु केलेल्या सलूनचे उदघाटन केले. त्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांना पहिला ग्राहक होण्याचा मानही मिळाला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here