जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

Thumbnail
Thumbnail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धारावी, युवकांची आणि असंघटीत क्षेत्राची – रोहीत पवार

मुंबईतील धारवी आणि परिसरात राहणार्या लोकांबद्दल, त्याच्याकडे असलेल्या रोजगाराच्या संधीं आणि त्याच्या एकंदर जिवणावर भाष्य करणारा रोहीत पवार यांचा खास लेख

           क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय माहित आहे का ?अर्थकारणातील एक साधी गोष्ट म्हणजे क्रेडिट सिस्टिम. यात काय असतं तर कोणताही व्यवहार करताना माणसं माणसांवर विश्वास ठेवतात. तो पैसा परत करतो हा विश्वास. या विश्वासावर व्यवहार चालतात. छोटेमोठ्ठे उद्योग उभा राहतात. हजारो लाखों कुटूंब जगतात.आत्ता एक उदाहरण सांगतो, असाच एक छोटा उद्योग होता. जास्त नाही आठ दहा जण मजुरांना घेवून करण्यात येणारा. यात क्रेडिट सिस्टिम असल्यानं उत्पादन झालेला माल हा उधारीवर पुढे गेला. अचानक नोटबंदी झाली. समोरच्या व्यक्तीबरोबर खूप वर्षांचा व्यवहार होता, पण त्याच्याकडे द्यायला पैसे नव्हते. आठ दहा मजूरांना घेवून उभा केलेल्या व्यवसायात त्याला रोजची मजूरी द्यायची होती. पण आत्ता जवळ रोख पैसा नव्हता. एका निर्णयामुळे खेळत भांडवल शुन्य झाले.परिणाम काय झाला ? आठ दहा मजुरांमुळे चालणारा उद्योग बंद झाला. आठ दहा मजूर म्हणजे किमान चाळीस जणांच पोट भरण्याचं साधन. तेच बंद झालं. परिणाम काय झाला ? आठ दहा मजुरांमुळे चालणारा उद्योग बंद झाला. आठ दहा मजूर म्हणजे किमान चाळीस जणांच पोट भरण्याचं साधन. तेच बंद झालं. Rohit Pawar

इतर महत्वाचे लेख

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

          आत्ता सांगण्यासारखी दूसरी गोष्ट म्हणजे हे उदाहरण खरं आहे.तो छोटा उद्योग करणारा व्यक्ती खरा आहे. त्याच्याकडे काम करणारे ते मजूर खरे आहेत आणि त्यांच कुटूंब देखील खरं आहे. ते सर्वजण धारावीत राहणारे. मुंबईच्या पावसामुळे गळणाऱ्या एका खोलीत दाटीवाटीने राहणारे सर्वजण माझ्याशी बोलत होते तेव्हा एक निर्णय चुकीचा निघाला तर काय होवू शकतं याच जिवंत उदाहरण माझ्या समोर होतं.
          काही दिवसांपुर्वी धारावीत भेट दिली. कारण अस होत की, सृजन उद्यौजकता व कौशल्य विकास कार्यक्रम राबवत असताना असंघटीत क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न जाणवत होते. आपण म्हणतो असंघटीत क्षेत्र खूप मोठ्ठ आहे. असंघटीत क्षेत्राच खूप नुकसान झालं. आरोप प्रत्यारोप होतात पण नेमकं काय चाललं आहे ते पाहावं, राजकारणाच्या पलिकडे जावून या गोष्टी समजून घ्याव्यात. चुक आणि बरोबरीच्या पलिकडे एक माणूस म्हणून माणसांच्या अडचणी समजून घ्याव्यात म्हणून धारावी पुर्ण दिवस फिरून काढली. एक दिवस म्हणजे काही जणांना कमी काळ देखील वाटेल पण या एका दिवसात जे दिसलं, जे पटलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
        धारावीची लोकसंख्या अंदाजे आठ ते दहा लाख. आणि क्षेत्रफळ 2.1 चौ.किलोमीटर. म्हणजे पर चौ. किलोमीटर मागे ५ लाख लोकं. म्हणजे किती तर एका छोट्या खोलीमध्ये दहा ते पंधरा मजूर. दिवसभर व्यवसाय करुन त्याच गाड्यांवर झोपणारे मजूर. चालण्यासाठी छोटीशी वाट. या गर्दीतून या छोट्याशा वाटेवरुन चालत गेला तर समोर दिसतात दाटीवाटीनं जगत एकमेकांना आधार देत एक छोटासा व्यवसाय उभा करत सुमारे आठ ते दहा हजार कोटींची अर्थव्यवस्था चालवणारी माणसं !
Thumbnail
            मी सकाळी नऊ दहाच्या सुमारास धारावीमध्ये पोहचलो होतो.अशाच एका बोळातून वाट काढत पुढे गेलो तर एक मुलगा प्लॅस्टिकच्या बाटल्या, रिकामे ग्लास घेवून जात होता. तो काय करतो तर ते भंगारमध्ये विकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वस्तू रिसाइकल होतात. त्याच्यासारखे अनेक लोक हे काम करतात. या कामातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात महिलांचा समावेश आहे. त्या मुलाचा माग काढत पुढे गेलो तर एका चहावाला भेटला. त्याची गंमत्त अशी की त्यानं प्लॅस्टिकबंदीमुळे आपल्या गाड्यावर पाटी लावली होती. “पार्सलसाठी घरातून भांडी घेवून येणे.” गोष्ट गंमतीशीर वाटली पण या बंदीमुळे व्यवसायाची एक साखळी तुटल्याची देखील दखल आपणाला घ्यावी लागेल. आत्ता प्लस्टिकबंदी चुकीची आहे अस माझं म्हणणं नाही, पण व्यवसायाची एक साखळी आपल्या घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाने तुटणार असेल तर त्यासाठी पर्याय निर्माण करण्याची, त्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे इतकच सांगायच आहे. Rohit Pawar

           चहावाल्याच्या समोरच एक केसकर्तनालय होतं. २०० रुपयात तो केस, दाढी आणि चेहरा फेशियल करुन देतो. गेली ९ वर्ष तो हा व्यवसाय करतोय. छोट्या मोठ्या दूकानाबरोबर इथे फिरते केशकर्तन करणारी माणसं देखील होती. ती काय करतात तर जिथे गिऱ्हाईक मिळेल तिथे ठाम मांडून व्यवसाय सुरू करतात. त्याच्याशी जेव्हा बोललं तेव्हा तो म्हणाला, आत्ता लोकं फक्त केस कापतात. दाढी घरीच करतात. मला वाटत सध्या काय परस्थिती आहे हे सांगण्यासाठी अत्यंत छोट आणि महत्वाच उदाहरण हे असावं. अशाच प्रकारे कपडे धुण्याचं ते इस्त्री करण्याचं काम चालतं. छोट्याशा जागेसाठी दहा हजारांच भाडं. बाकी महिन्यांचा हिशोब वेगळा. त्यातून त्याला मिळणारा नफा म्हणजे जगण्यासाठी मिळतील तितकेच पैसै. शिल्लक अस काहीच नाही. जेवण करण्यासाठी एक कॅन्टिन होतं. कामगारांना स्वस्तात जेवण तिथेच उपलब्ध होतं. कॅन्टिनवाल्याकडे आठवड्याला पाचशे ते सातशे माणसं जेवण करतात. असे कित्येक व्यवसाय याठिकाणी निर्माण झाले आहेत. हि झाली तिथल्या लोकांच्या सोयीसाठी निर्माण झालेली अर्थव्यवस्था. भारतातल्या कोणत्याही खेड्यात किंवा कोणत्याही शहरात तुम्हा दिसते अगदी तशीच. फरक फक्त इतकाच की समोरच्याची आर्थिक परस्थिती देखील आपल्या सारखीच आहे याचा विचार करुन कमी पैशात जास्तीत जास्त चांगल देणारी हि अर्थव्यवस्था. पण ही छोटीशी अर्थव्यवस्था ज्यामुळे चालते. ज्या कारणामुळे तिथे मजूर राहू शकतात असे कोणते उद्योग या ठिकाणी आहे. व त्यांची सध्या काय अवस्था आहे हे मला पहायचं होतं.धारावीतल्या अशाच एका बोळातून मार्ग काढत मी एका लेदर व्यावसायिकाकडे गेलो. या भागात लेदरचे १०० व्यवसाय असतील. आणि त्या व्यवसायांवर अवलंबून असणारे हजारो कामगार. निर्माण करण्यात आलेली बॅग, जॅकेट , बेल्ट, पाकिट अशा वस्तू विकणारी ३०० च्या दरम्यान दूकान. उत्पादन करणारे, ब्रॅण्ड निर्माण करणारे व ते होलसेल व रिटेल भावात विकणारी अशी हजारो कुटूंब इथ राहतात.

Rohit Pawar talking With Dharavi Locals

अशाच एका लेदर व्यवसायिकांला मला भेटता आलं. हातात खेळत भांडवल नसल्याने त्याचा मित्राचा धंदा बुडाल्याचं त्यांन सांगितलं. तो सांगू लागला,” नोटबंदीनंतर एका आठवड्याभरातच लोकांच्या हातातले रोख पैसै संपले. इथले सर्व व्यवहार हे रोखीतच होतात. याचं कारण अस नाही की, लोकांना काळा पैसा कमवायचा आहे. लोकांच शिक्षण कमी, शिवाय टॅक्स सिस्टिमबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसतं. एखादा नवीन निर्णय आला तर पहिलीतल्या मुलाला दहावीची परिक्षा द्यावी लागते अस वाटतं. खूप कमी जणांना निर्णय समजतात. लोकांना टॅक्स सिस्टिम माहीत नाही. त्याची माहिती होते इतक्यात त्यात बदल केले जातात. विश्वास असल्याने अनेकदा व्यवहार उधारीवर चालतात. त्यातून खेळतं भांडवल हेच व्यवसाय जिवंत ठेवतं. नोटबंदीनंतर हातात असणारे पैसे संपले आणि लोकांना आत्ता काय करायचं याचा प्रश्न भेडसावू लागला. काही लोक कसेबसे तगले तर काही बुडाले”. मात्र या व्यावसायिकांनीच धारावी नावाचा लेदरचा स्वत:चा असा ब्रॅण्ड देखील विकसित केला आहे.

          एक मोठ्ठी इंडस्ट्री येथे उभा झाली आहे. इथले लेदरचे जॅकेट बाहेरच्या देशांमध्ये देखील जातात. मधल्या अनेक साखळ्यांमुळे उत्पादकांच्या हातात राहणारी किंमत नाममात्र असली तरी निदान उलाढाल होते. ब्रॅण्डिंग होतं व त्यातून व्यवसाय सेटल होतो. मात्र अचानकपणे शासकिय पातळीवर एखादा असा निर्णय घेतला जातो की, हातातलं काम सोडून कामगारांना पुढे काय करायचं याचाच प्रश्न पडतो. असाच दूसरा उद्योग म्हणजे कपडे डाईंग करण्याचा. कपडे डाईंग करणे म्हणजे कपड्यांना रंग देणं. कपडे शिलाई करणं, कपड्यांना रंग देणं अशा कामं देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी केली जातात. याच ठिकाणी एक तरुण मला भेटला त्याच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा तो म्हणाला अगोदर इथे वीस माणसं काम करत असतील तर आत्ता दहा जण करतात. कामगारांची संख्या निम्यावर आली. नोटबंदी करण्यात आली तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. पैशाला पैसे जोडून साठवले होते. काम बंद झाल्यानं पुढं काय करायची त्याची काळजी आणि त्याच बरोबर बहिणीचं लग्न अस संकट होतं. Rohit Pawar

          तो मनापासून सांगत होता आणि मला आठवलं ते नोटबंदीनंतर जपानच्या दौऱ्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं भाषण. त्यात ते “घर मैं शादीं हैं पैसे नहीं हैं” म्हणून टाळी वाजवत होते. टिव्हीवर गंमतीशीर वाटणारा प्रसंग प्रत्यक्षात एखाद्याचा जीवनमरणाचा प्रश्न बनू शकतो हे आपण कस काय विसरुन जातो? शेवटी तो पोटतिडकीने म्हणाला, “पुर्वीच सरकार बोलत नव्हतं पण काहीतरी करत तर होतं, हे सरकार बोलतं पण करत काहीच नाही आणि काही केलच तर ते आमच्यासारख्या छोट्या लोकांचं कंबरड मोडणार असतं”. असेच बॉक्स तयार करणारे कामगार, रंगाचे डब्बे केमिकलने धुवून पुन्हा वापरासाठी तयार करणारे कामगार, प्लॅस्टिंकचं रिसायकलिंग करणारे कामगार, रेक्झिनच्या पिशव्या करणारे कामगार असे अनेकजण. आणि यांच्या सोयीसाठी उभा राहिलेली दूसरी अर्थव्यवस्था. चहा दुकानदार, कॅन्टिन चालवणारा, केशकर्तन करणारा, कपडे इस्त्री करुन देणारा, भाड्याने जागा देणार असे अनेकजण..असे कित्येकजण या दोन चौरस किलोमिटरच्या भागात जगतायत. बर ते जगतात कसे तर इथेच मशिद, इथेच मंदिर इथेच बौद्धविहार. ते एकोप्याने जगतायत कारणं, ज्यांना पोटाचा प्रश्न भेडसावत असतो त्यांना जाती आणि धर्माचे प्रश्न कधीच पडत नाहीत.दिवसभर मी या माणसांबरोबर बोललो. त्यांच्यासोबत राहिलो. कदाचित हा एक दिवस तुम्हाला छोटा देखील वाटेल. पण आपली अर्थव्यवस्था कशी चालते आणि ती कुणामुळे चालते हे सांगण्यासाठी दिवसभरात समजुन घेतलेल्या गोष्टी पुष्कळ होत्या.

       धारावीत दिवसभर फिरल्यानंतर जाणवलं की, धारावी हे एक प्रातिनिधीक उदाहरण झालं. गाव असो की शहर असंघटित क्षेत्रात असणारे सगळे उद्योग असेच विश्वासावर चालतात. भारतातल्या एकुण उद्योगापैकी जवळपास ८० ते ९० टक्के उद्योग हे असंघटित क्षेत्रात आहेत. नोकरी करणाऱ्यांच प्रमाण देखील याच क्षेत्रात अधिक आहे. असंघटित क्षेत्रातील लोकांचं स्वत: कुटूंब असतं. मुलं असतात. त्यांच्या शिक्षण देखील अशा एखाद्या परस्थितीमुळे सुटूतं. कोणताही निर्णय घेत असताना त्याचा असंघटित क्षेत्रावर कोणता फरक पडेल याचा अंदाज घ्यावा लागतो. निर्णय चुकीचे अथवा बरोबर नसतात. कदाचित घेतलेले निर्णय बरोबर देखील असते, पण कधी जेव्हा लोकांशी सरकार बोललं असतं. त्यांच्या समस्या समजून घेतल्या असत्या आणि टप्याटप्याने त्याची अंमलबजावणी केली असती तरच !

 

rohit pawar

रोहित पवार

(युवा नेतृत्व आणि जि.प.सदस्य, पुणे)