फडणवीसांच्या गाडीवर चप्पलफेक; रोहित पवार म्हणतात, चप्पल भिरकावने हे…

rohit pawar fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे चप्पल फेकण्यात आली. पिंपरी चिंचवड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी फडणवीस आले असता ही घटना घडली. या घटनेवरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हंटल आहे.

याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही असे रोहित पवार यांनी म्हंटल.

दरम्यान, या एकूण प्रकरणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, हे असे फाल्तू आणि चिल्लर लोक असतातच. स्वतः काहीही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीही करू शकले नाहीत. पुतळ्याच्या उद्घाटनाचे आणि अटलजींच्या कार्यक्रमाला विरोध होत असेल तर त्यांची बुद्धी तपासून पाहावी लागेल’ अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.