अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी जामखेड मधील हळगाव येथील जनतेशी संवाद साधला. ‘मतदारसंघात विकास कामे चांगली होत नसतील तर तत्काळ मला कळवा. चांगले कामे करून घेण्यासाठीचा मी बॉस आहे. जो चांगली कामे करणार नाही त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी शानदार विजय संपादित केला आहे. त्यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा दारूण पराभव केला आहे. यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘मी केलेल्या विकास कामांचा फलक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लावले जाणार नाहीत. कारण मला मतदारसंघात जनतेच्या डोळ्यांना दिसतील अशीच कामे करावयाची आहेत, असे रोहित पवार म्हणाले.