Rohit Sharma : अँडरसनचा स्विंग अन रोहित क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Bold
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाला आज सुरुवात झाली. इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत गुंडाळल्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरु झाला. परंतु सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. इंग्लंडचा स्टार जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने दोघांना पॅव्हेलियन मध्ये माघारी पाठवले. यशस्वी जैस्वाल अवघ्या १७ धावांवर जो रूटच्या हातात झेल देऊन बाद झाला तर रोहित शर्माचा थेट त्रिफळाच अँडरसनने उडवला. याबाबतच विडिओ सुद्धा समोर आला आहे.

रोहितचा पाय हालला पण नाही – Rohit Sharma

नव्या चेंडूवर स्विंग बॉल खेळताना रोहित नेहमीच अडचणीत सापडला आहे. अपुऱ्या फुटवर्क मुळे त्याला तेज गोलंदाजीचा सामना करताना रोहित कधी कधी अडखळतो. आजही असच झालं. जेम्स अँडरसनच्या स्विंग चेंडूवर रोहित (Rohit Sharma)थेट क्लीन बोल्ड झाला. अँडरसनने टाकलेल्या या चेंडूचा टप्पा आणि स्विंग इतका अचूक होता कि रोहितकडे या बॉलचे उत्तरच नव्हते. बोल्ड झाल्यानंतर रोहित अक्षरशः बघतच राहिला. रोहित शर्माचा क्लीन बोल्ड झाल्याचा (Rohit Sharma Bold Out) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा दुसऱ्या डावात २१ चेंडूत १३ धावांवर बाद झाला. सध्या भारतीय संघाचा स्कोर १३०- ४ असा असून रोहित, यशस्वी, रजत पाटीदार आणि श्रेयश अय्यर तंबूत परतले आहेत तर शुभमन गिल आणि अक्षर पटेल हे मैदानात आहेत. भारताकडे एकूण २७३ धावांची आघाडी असून आजचा सामन्याचा तिसराच दिवस आहे. त्यामुळे हा कसोटी सामनाही निकाली लागण्याची शक्यता आहे.