IND vs Aus : रोहित शर्माचे दणदणीत शतक; गांगुली, धोनी, कोहलीला जमलं नाही असा रेकॉर्ड केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दणदणीत शतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेट मधील रोहितचे ने 9 वे शतक आहे. या शतकासोबत कसोटी, वनडे आणि T 20 अशा तिन्ही फॉरमॅट मध्ये शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितच्या शतकी खेळीच्या जोरावर सध्या भारताची स्थिती 5 बाद 224 अशी आहे.

आजच्या दुसऱ्या दिवशी कालच्या 1 बाद 77 वरून भारताने डावाची सुरुवात केली. सुरुवाती पासूनच रोहित नेहमीच्या लयीत दिसत होता. त्याने 171 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं. एकीकडे रोहितकडून ऑस्त्रेलियन गोलंदाजांचा समाचार सुरु असताना दुसरीकडे मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव हे मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. विराट कोहली 12, चेतेश्वर पुजारा 7 आणि सूर्यकुमार यादव अवघ्या 8 धावांवर तंबूत परतले. ऑस्ट्रेलिया कडून टॉड मर्फी याने 4 बळी घेतले तर स्कॉट बोलंडने 1 बळी घेतला. सध्या रोहितच्या जोडीला जडेजा मैदानात आहे.

रोहितच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीतील हे 43वे शतक असून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील त्याचे पहिलेच शतक ठरले. त्याचबरोबर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधारही ठरला. त्याच्या आधी सौरव गांगुली पासून ते महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीपर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला असा कारनामा करता आलेला नाही.