राष्ट्रगीत सुरु असतानाच रोहित शर्मा झाला भावुक; Video Viral

rohit sharma emotional
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T 20 विश्वचषक स्पर्धेत कट्टर विरोधक असलेल्या भारत आणि पाकिस्तान मध्ये महामुकाबला सुरु आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. तत्पूर्वी सामना सुरु होण्याच्या आधी राष्ट्रगीता दरम्यान, भारताचा कर्णधार भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. रोहित शर्माचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सामना सुरु होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत म्हंटल गेलं. यावेळी राष्ट्रगीत संपताना रोहितच्या डोळ्यात पाणी दिसले. जेव्हा राष्ट्रगीताचे शेवटचे शब्द जय जय जय है म्हणत असताना रोहित चांगलाच भावुक झाला आणि त्याने आपले डोळे लगेच बंद केले. मात्र कॅमेरात या भावना कैद झाल्या.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जलदगती गोलंदाज अक्षरदीप सिंग याने पहिलया २ ओव्हर मध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवाड या पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडले आहे. सध्या या सामन्यात भारताची स्थिती मजबूत दिसत आहे.

दोन्ही संघाचे अंतिम 11 –

भारत –

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

पाकिस्तान-
बाबर आजम, मोहम्मद रिजवान, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन अफरीदी, नसीम शाह और हारिस रउफ