रोहित शर्मा मला माझ्या मोठ्या भावासारखा ; अजिंक्य रहाणेने सांगितलं रोहितसोबतचं खास नातं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा दमदार फलंदाज अजिंक्य रहाणेचे सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थित रहाणेने कल्पक नेतृत्त्वाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. आता टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे आणि अजिंक्य रहाणे भारतीय खेळाडूंसह चेन्नईमध्ये आहे. रहाणे सोशल मीडियावर देखील सतत ऍक्टिव्ह असतो. शनिवारी अजिंक्यने चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तर सत्र घेतले.

इंस्टाग्रामवर रहाणेने चाहत्यांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आणि एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्माशी त्याचे नाते कसे आहे ते सांगितले. रहाणे आणि रोहित बर्‍याच वर्षांपासून एकत्र खेळत आहेत आणि दोघेही मुंबईचे आहेत. रहाणेने रोहितशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल लिहिले की, ‘रोहित शर्मा माझ्या भावासारखा आहे आणि माझे आणि त्यांचे नाते खरोखरच खास आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिके दरम्यान देखील विराटच्या अनुपस्थित रोहित अजिंक्यला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. अखेरच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर अजिंक्य रहाणेने रोहित शर्माला कडकडून मारलेली मिठी दोघांच्या नात्यातील गोडवा स्पष्ट करत होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like