देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ महाराष्ट्रभर होतोय व्हायरल ; नेमकं काय घडलं? अण्णांची एवढी भीती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषण करणार होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी अचानकपणे माघार घेत उपोषण सुरू करण्यापूर्वीच स्थगित केलं. अण्णांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु नेमक्या त्याच पत्रकार परिषदेतील फडणवीसांचे 22 सेकंदाचा एक व्हिडीओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आहे

पत्रकारांनी अण्णांना विचारले की तुम्हाला तुमची विश्वासार्हता राहील असं वाटतं का?? त्याच वेळेस फडणवीसांची नजर सावध झाल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. अण्णा आता बोलतील असं वाटत असतानाच, त्यांना प्रश्नच ऐकू गेलं नसल्याचं लक्षात आलं. कुणी तरी मोठ्यानं प्रश्न विचारा असं म्हटलं पण तितक्यात फडणवीस म्हणाले, नाही नाही समजलं. नंतर अण्णांकडे बघत खुर्चीवरुन उठत मला वाटतं प्रश्नोत्तरांची गरज नाही असं फडणवीस म्हणाले. खरं तर त्यांनी अण्णांना थेट उठण्याचाच इशारा केला.

फडणवीसांना यशस्वी झालेलं मिशन बिघडण्याची भीती वाटली?

अण्णा आणि फडणवीसांचा हा व्हिडीओ सध्या महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय. अण्णांना ऐकू आलं असतं तर त्यांनी नक्कीच उत्तर दिलं असतं. अण्णा कधीही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर टाळत नाहीत. पण फडणवीसांना मात्र अण्णा बोलले तर यशस्वी झालेली चर्चा फिसकटण्याची भीती वाटली की काय अशी चर्चा सोशल मीडियात केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like