Rohit Sharma Meet Devendra Fadnavis : रोहित शर्माने घेतली फडणवीसांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

Rohit Sharma Meet Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma Meet Devendra Fadnavis। आंतरराष्ट्रीय कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. रोहित शर्माने काल वर्षा या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हि भेट कशासाठी होती? रोहित शर्मा- देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं काय बोलणं झालं याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रोहितची ‘वर्षा’वर जाण्याची 11 महिन्यांमधील दुसरी वेळ ठरली. यापूर्वी टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी रोहितच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप उंचावला होता त्यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला वर्षावर बोलवलं होत.

रोहित शर्मा आणि देवेंद्र फडणवीस भेटीबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. रोहित शर्मासोबतचे फोटो शेअर करत फडणवीस म्हणाले, ”रोहित शर्मा यांची आज वर्षा निवास्थानी भेट झाली. यावेळी त्यांचं स्वागत केलं. या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. (Rohit Sharma Meet Devendra Fadnavis)

रोहितने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली– Rohit Sharma Meet Devendra Fadnavis

दरम्यान, रोहित शर्माने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचं देखील रोहित शर्माने स्पष्ट केले. दुसरीकडे, पाकिस्तान विरुद्धचा तणाव निवळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित 17 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 12 मे रोजी 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.