Wednesday, February 8, 2023

Rohit Sharmaची बॅट अखेर तळपली, युवराज सिंहचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – रोहित शर्मा (rohit sharma) मागच्या काही कालावधीपासून खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे त्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी मोठा चिंतेचा विषय ठरला होता. पण आता हे सगळं टेन्शन संपलं आहे. कारण रोहित शर्माने (rohit sharma) नेदरलँड विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावलं. रोहितने या खेळीत 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. या इनिंग दरम्यान त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या खेळीदरम्यान रोहितने 3 षटकार लगावले. याबरोबर त्याने युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला. रोहित शर्मा (rohit sharma) टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.

किती षटकार मारले?
रोहित शर्माने (rohit sharma) आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये 34 षटकार लगावले आहेत. या अगोदर रेकॉर्ड भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या नावावर होता. त्याने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 33 षटकार लगावले होते. टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 63 सिक्स मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

- Advertisement -

टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती धावा?
तसेच या खेळीबरोबर रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपमध्ये 900 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. त्याने श्रीलंकेच्या तिलकरत्न दिलशानला मागे टाकले आहे. त्याच्या नावावर 897 धावा होत्या. रोहित (rohit sharma) या यादीत आता चौथ्या स्थानावर आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एकमेव श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेनं एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. जयवर्धनेनं टी-20 विश्वचषकाच्या 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याच्या नावावर 989 धावा आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 31 डावात 965 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी