हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI नव्या कोचच्या शोधात आहे. यासाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांची नावे समोर येत आहे. आधीच संघाचा उपकर्णधार असल्याने कर्णधार पदाची माळ आपोआप हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडेल असं बोललं जात होते. मात्र आता यामध्ये मोठा ट्ट्विस्ट आला आहे. त्यानुसार, सूर्यकुमार यादव भारताचा नवा T20 बनण्याची शक्यता आहे. कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नुकताच रीटायर झालेल्या रोहित शर्माने सुद्धा कॅप्टनशिपच्या पदासाठी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) आपली पसंती दिलीय. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
हार्दिक पंड्याने वर्ल्डकप मध्ये जरी दमदार कामगिरी केली असली तरी सततची दुखापत हि त्याची कमकुवत बाजू आहे. पुढची T20 विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये आहे. त्यासाठी योग्य तयारी व्हावी याकरिता टीम इंडियाला प्रमुख कर्णधाराची गरज आहे. हार्दिकच्या दुखापती आणि त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट टीमसाठी एक मोठ आव्हान ठरतं. ज्यामुळे दीर्घकालीन नेतृत्वासाठी त्याच्या योग्यतेबद्दल चिंता आहे. यामुळेच गौतम गंभीर आणि रोहित शर्माने नव्या कर्णधार पदासाठी हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादवला आपली पसंती दिली आहे. गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी हा निर्णय पंड्याला आधीच कळवला असल्याचेही रिपोर्टमधून सांगण्यात आलय.
कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याच्या कामगिरी बद्दल सांगायचं झाल्यास, आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून, हार्दिक पांड्याने 45 सामन्यांमध्ये नेतृत्व केले. यातील 26 सामन्यात त्याला विजय मिळवता आलाय, त्याची विजयाची टक्केवारी 57.77 इतकी राहिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, हार्दिकने आतापर्यंत 16 T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाच नेतृत्व केलय. यात 10 सामन्यात त्याला विजय मिळवता आलाय तर 5 मॅचमध्ये पराभवाचा समन्व करावा लागला आहे तर एक सामना टाय झालेला. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवने 7 T20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलय. यात 5 मॅचमध्ये विजय मिळवला तर 2 सामन्यात पराभव झाला.