हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद दिल्यानंतर मुंबईच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. स्टेडियमवर सामना सुरु असताना हार्दिक पंड्याच्या विरोधात घोषणाबाजी देत रोहित शर्माचे चाहते आपला राग व्यक्त सुद्धा करत आहेत. यापूर्वी गुजरात आणि हैद्राबाद मध्ये हार्दिकच्या विरोधात नारेबाजी पाहायला मिळाली होती. काल तर चक्क मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियम वरील सामन्यात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी हार्दिकविरोधात हुटींग करत पुन्हा एकदा आपला राग व्यक्त केला. मात्र याचवेळी रोहित शर्माने जे काही केलं ते पाहून तुम्हीही हिटमॅनवर खुश व्हाल
रोहितने काय केलं?
रोहित शर्मा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी मैदानावरील प्रेक्षकांकडून हार्दिकला ट्रोल केले जात होते. पण रोहितने हातवारे करत प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु हा विडिओ कालच्याच सामन्यावेळीचा आहे का ? त्याची पुष्टी हॅलो महाराष्ट्र करत नाही. मात्र रोहितची हि रिअक्शन पाहून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल हे मात्र नक्की… मुंबईत रोहितवर प्रेम करणारा चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. चाहत्यांनी मैदानात ‘मुंबई का राजा रोहित शर्मा’च्या घोषणा दिल्या. सामना सुरु झाल्यापासून तो संपेपर्यंत रोहित शर्मा नावाच्या घोषणा चाहत्यांकडून सुरूच होत्या
Rohit Sharma requesting the Wankhede crowd to stop booing Hardik Pandya ❤️🫡#MIvRRb #MIvsRR #RohitSharma #IPL2024 #HardikPandya #RRvsMI@GetBlockGames $BUBBLE@WeArePlanetMojo $MOJO@Imaginary_Ones @Forge#ForgeRecap #Forge $BLOCK pic.twitter.com/sFG5VY0MoU
— Sahil (@kotwal_vis69403) April 2, 2024
संजय मांजरेकरानी प्रेक्षकांना फटकारले –
दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्याआधीही नाणेफेकीवेळी चाहते हार्दिकला ट्रोल केलं. यावेळी माजी कर्णधार आणि समालोचक संजय मांजरेकरांनी प्रेक्षकांना फटकारले होते. संजय मांजरेकरने मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नम्रतेने वागण्याचा सल्ला दिला , मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांनी ते न ऐकता हार्दिक पंड्या विरुद्धचे हुटींग सुरूच ठेवलं. एकीकडे हार्दिक विरुद्ध नारेबाजी आणि दुसरीकडे मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणांनी वानखेडे स्टेडियम दणाणून सोडलं होते.