Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती!! भारताला World Cup जिंकवून घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Retirement
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे (Rohit Sharma Retirement) क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही T20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहितच्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.

अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला होता, “हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही मर्यादा ओलांडली याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटला हा मोठा धक्का आहे.

कस आहे रोहितचे T20 करिअर ? Rohit Sharma Retirement

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.