सुपर ओव्हर मध्ये ईशान किशनला का नाही पाठवलं?? रोहित म्हणतो…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये काल मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला.अटीतटीच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर राहिला. ईशाननं 99 तर पोलार्डनं नाबाद 60 धावा फटकावल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईला सात धावा करता आल्या. बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्सनं सात धावा पार करुन यंदाच्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला.

मुंबईच्या ईशान किशननं बंगलोरविरुद्ध 99 धावांची धडाकेबाज खेळी उभारली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. ईशाननं 58 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह 99 धावा फटकावल्या. असे असे असूनही कर्णधार रोहित शर्माने त्याला सुपर ओव्हरमध्ये ईशानला फलंदाजीसाठी पाठवले नाही त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, सामना संपल्यानंतर रोहितने ईशानला फलंदाजीसाठी का पाठवले नाही याचा खुलासा केला.

सुपर ओव्हरमध्ये ईशान किशनला फलंदाजीसाठी न पाठवल्याबद्दल रोहित म्हणतो, आम्ही पहिला विचार केला होती की सुपर ओव्हरमध्ये किशनला फलंदाजीसाठी पाठवावे. पण खूप वेळ फलंदाजी केल्यामुळे त्याला फ्रेश वाटतं नव्हचं, म्हणूनच आम्ही हार्दिकला फलंदाजीसाठी पाठवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like