Rohit Sharma : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडणार, पण कधी?? समोर आली मोठी अपडेट

Rohit Sharma Mumbai Indians
Rohit Sharma Mumbai Indians
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल (IPL 2014) मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर खूश नसून आयपीएल 2024 हंगामाच्या शेवटी तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडू शकतो. टाइम्स नावने याबाबत वृत्त दिले आहे. परंतु मुंबईनंतर रोहित कोणत्या संघाकडून खेळतो ते पाहावे लागेल. रोहित हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर खुश नाही अशाही चर्चा आहेत.

न्यूज 24 नुसार, मुंबई इंडियन्सच्याच एका खेळाडूने माहिती दिली आहे की रोहित शर्मा (Rohit Sharma) हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर नाराज आहे, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच मुंबईने आत्तापर्यंत एकही मॅच जिंकली नाही, त्यामुळे हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्स टीकाकारांचे धनी बनले आहेत. सूत्रानुसार, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोन्ही खेळाडूंमध्ये अनेक निर्णयांवर वाद होत आहेत, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये संघाचे वातावरण चांगले होऊ देत नाही. 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL 2024 मधील संघाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या शिबिरातील तणाव स्पष्ट झाला होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाला रोहित शर्मा हा चांगलाच वैतागला आहे. रोहितला हार्दिकशी वाद घालायचा नाही किंवा भांडण करायचे नाही

दरम्यान, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केली. मात्र मुंबईच्या चाहत्यांना हा निर्णय पटलेला नाही. त्याचा थेट परिणाम मैदानावर दिसत आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून हार्दिक पंड्या विरोधात नारेबाजी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी करत रोहित शर्माचे कौतुक कऱण्यात येत आहे.