हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचे विधेयक बुधवारी विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना १ लाख रुपयांच्या दंडाची तरतूदही यामध्ये करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा राज्यभर लागू होणार आहे. असं ही गायकवाड आणि सांगितलं.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी भाषेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या खासगी शाळा शैक्षणिक शुल्कांचे नियम धाब्यावर बसवतात. अशा शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान मंगेश कुडाळकर यांनी राज्यातील सर्व शैक्षणिक मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक विधानपरिषदेत मांडले जाणार असून त्यानंतर ते मराठी भाषा दिनानिमित्त उद्या विधानसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल.