Row Or Dry Coconut | ओला की सुका ! आरोग्यासाठी कोणता नारळ फायदेशीर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Row Or Dry Coconut | आजारी असल्यावर किंवा अगदी दैनंदिन आयुष्यात देखील डॉक्टर आपल्याला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. कारण नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काही लोकांना ओला नारळ आवडतो, तर काही लोकांना पाळलेला नारळ आवडतो. नारळ जरी एकच असला तरी ओल्या आणि वाळलेल्या नारळामध्ये (Row Or Dry Coconut ) खूप फरक आहे . आपल्याला हे माहीत असणे खूप गरजेचे असते. त्यानंतर तुम्ही ते दोन्हीही खाऊ शकता. नारळ ओला असताना त्याची चव पोषण तत्त्व आणि गुणधर्म वेगळे असतात. आणि नारळ वाळल्यानंतर त्यातले गुणधर्म बदलतात आता आपल्या आरोग्यासाठी ओला नारळ योग्य आहे की वाळलेल्या नारळ हे आपण जाणून घेऊया.

ओला नारळ | Row Or Dry Coconut

ओला नारळ हा चवीला थोडासा गोड आणि खमंग असा असतो. तर सुके खोबरे हे जास्त गोड नसते आणि ते चावायला देखील खूप वेळ लागते. वाळल्यानंतर नारळाची चव ही कच्च्या नारळापेक्षा थोडी वेगळी लागते. ओल्या नारळामध्ये पाणी असते, तर वाळलेल्या नारळामध्ये पाणी नसते. त्यामुळे ओला नारळ हाइड्रेशनसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो.

त्याचप्रमाणे नारळ वाळल्यानंतर त्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तसेच वाळलेल्या जास्त साखर, कॅलरीज आणि फॅट्स देखील आढळतात. त्याचप्रमाणे सुके खोबरे जास्त दिवस टिकावे म्हणून त्यावर प्रिझर्वेटिव्ह आणि व्हाइटनर टाकले जातात. त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात.

ओल्या नारळामध्ये (Row Or Dry Coconut ) अनेक जीवनसत्व आणि खनिज असतात. आणि पुरेशा प्रमाणात प्रथिने देखील आढळतात. यामध्ये कॅलरीज, हेल्दी फॅट आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील कमी असते. त्यामुळे हे उत्तम इलेक्ट्रोलाईट म्हणून देखील काम करते.

ओला नारळ की सुका नारळ शरीरासाठी योग्य काय ?

सुक्या नारळामध्ये ओलावा नसल्यामुळे त्यात चरबी जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे वाळलेल्या नारळात कॅलरीचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामध्ये चरबी प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण देखील जास्त असते. कच्च्या नारळापेक्षा ओला सुका नारळा जास्त टिकतो. परंतु पौष्टिक मूल्य आणि गुणधर्माच्या आधारावर ओला नारळ हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.