हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Royal Enfield चे सीईओ विनोद दासारी यांनी ऑगस्ट 2020 मध्येच स्पष्ट केले होते की, कंपनी लवकरच इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. नुकत्याच आलेल्या बातमी नुसार, आता रॉयल एनफिल्डकडून आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक मिड-सेगमेंटमध्ये ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, या श्रेणीमध्ये कंपनीची सर्वात लोकप्रिय 350cc ची उत्पादने ठेवण्यात आली आहेत.
आता तर कंपनीने स्पॅनिश स्टार्टअप स्टार्कमधील 10.35 टक्क्यांची हिस्सेदारी देखील विकत घेतली आहे. या स्टार्टअप कंपनीने EVs ची बॅटरी सुधारण्यासाठीचा लाइटवेटिंग कोडही क्रॅक केला आहे. ज्यामुळे आता EVs च्या बॅटरीमध्ये चांगली रेंज मिळू शकेल. इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटवर फोकस करणे हा Royal Enfield च्या जागतिक विस्तार धोरणाचाच एक भाग आहे.
आता Royal Enfield (RE) कोणताही गाजावाजा न करता इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटवर करत आहे. कारण याद्वारे त्यांच्या भविष्यातील अनेक उत्पादनांची परिभाषाच बदलेल. यासाठी Royal Enfield कंपनीकडून गेल्या दोन-तीन वर्षांपासून EV तंत्रज्ञानासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट केले जात आहे. यासाठी कंपनीचे 65 हून जास्त इंजिनिअर्स आणि डिझायनर्सची टीम काम करत आहे. यासाठी त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांची मदत होते आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.royalenfield.com/in/en/home/
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…