Royal Enfield Hunter 350 च्या किंमतीत मोठी वाढ; आता द्यावे लागतील ‘इतके’ पैसे

Royal Enfield Hunter 350
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Royal Enfield Hunter 350 हि स्पोर्ट बाईक तरुणाईला चांगलीच भुरळ पाडत आहे. स्पोर्टी लूक आणि दणकट अशा या बाईकचे आत्ताच्या युवा अक्षरशः वेड लागले आहे. Royal Enfield Hunter 350 चा खपही चांगलाच वाढत आहे, मात्र त्याच दरम्यान आता कंपनीने या गाडीच्या किमतीत वाढ केली आहे. रॉयल एन्फिल्डच्या या बाईकच्या किमतीत 3 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता या बाईकची जुनी आणि नवीन किंमत काय आहे? याविषयी आपण जाणून घेऊया….

Royal Enfield Hunter 350 Retro आणि Metro या दोन ट्रिममध्ये लाँच करण्यात आली होती. जे तीन व्हेरिएन्ट मध्ये येतात. हंटर 350 ची किंमत आता 1.49 लाख ते रु. 1.75 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या स्पोर्टी बाईकच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नसून ती पूर्वीप्रमाणेच 1.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येते. परंतु इतर व्हेरिएन्टच्या किमती मात्र महाग झाल्या आहेत. त्या आम्ही खालीलप्रमाणे देत आहोत.

   Hunter 350 वैरिएंट                   नवीन किंमत (रुपये)       जुनी कीमत (रुपये)         अंतर

Retro Hunter Factory Series         1.49 लाख                 1.49 लाख                       –
Metro Hunter Dapper Series         1.70 लाख                1.67 लाख                     3,000
Metro Hunter Rebel Series           1.75 लाख                 1.72 लाख                    3,000

Royal Enfield Hunter 350 मध्ये काय खास आहे?

या बाईकमध्ये, कंपनीने 349cc क्षमतेचे एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर काउंटर बॅलन्स्ड इंजिन वापरले आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले असून 20.1PS पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. या दमदार बाइकमध्ये बाईक 13 लीटरची इंधन टाकी बसवण्यात आली आहे. एका लिटरमध्ये रॉयल इन्फिल्डची ही बाईक 40 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. Royal Enfield Hunter350 चे टॉप स्पीड 114 किमी प्रतितास इतकं आहे. ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये 300 मिमी डिस्क आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्क देण्यात आले आहे. मागील बाजूस, 6-स्टेप प्री-लोड अॅडजस्टेबल शॉक एब्जॉर्बर आहेत.