हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Royal Enfield ची क्रेज आजही भारतात पहिल्यासारखी आहे. या कंपनीच्या बाईक आजही खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही बाईक आतापर्यंतच्या तयार करण्यात आलेल्या बाईक्समध्ये एक महत्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे इटलीपासून ते भारतापर्यंत या नव्याने लॉन्च केलेल्या Royal Enfield Super Meteor 650 या बाइक्सची चर्चा आहे. पाहूया काय खास गोष्टी आहेत या बाइक्समध्ये…
कंपनीने आपली ही बाईक EICMA 2022 मध्ये प्रदर्शित केली होती. Super Meteor 650 दोन प्रकारात येणार असून एक Super Meteor 650 आणि दुसरी Super Meteor 650 Tourer होय. यामधील Super Meteor 650 अतिशय आकर्षक दिसते आणि याची डिझाइन मस्क्यूलर आहे. तसेच यात USD फोर्क्स आणि LED हेडलॅम्प मिळतात.
रॉयल एनफिल्डच्या या नवीन 650cc मॉडेलला पूर्ण प्रीमियम टच आणि फील मिळतो. याचे लहान व्हर्जन 350 Meteor सारखे असून पूर्ण एलईडी हेडलॅम्प सारख्या डिटेलिंगमुळे या बाईकला अधिक प्रीमियम लुक मिळतो. Super Meteor 650 Tourer सेलेस्टियल रेड आणि सेलेस्टियल ब्लू या दोन रंगांमध्ये येते. यामध्ये उंच फुटपेगसह एक मोठा विंडस्क्रीन आणि अधिक आरामदायक मोठी सीट देखील मिळते. (Royal Enfield)
इंजिन : रॉयल एन्फिल्डने नुकत्याच लॉन्च केलेल्या यात बाइकमध्ये 648cc ची क्षमता असणारे ट्विन मोटर इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 47bhp पॉवर आणि 52.3 Nm टॉर्कसह क्रूझरसारखा राइडिंग अनुभव देते. सर्व रॉयल एनफिल्ड बाईकमध्ये ही सर्वात जड आहे.शिवाय या बाइकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स बसवण्यात आलेले आहेत.
आकर्षक लूक : Royal Enfield ने हि बाईक फ्लॅगशिप मॉडेल म्हणून सादर केले जात आहे. सादर करण्यात आलेली ही नवीन क्रूझर बाईक आधुनिक असण्यासोबतच प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. आकर्षक अलॉय व्हीलसह, ट्यूबलेस टायर आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉडही यात देण्यात आले आहेत.
अशी आहे रचना : नव्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या या नव्या बाईकची रचनाही आकर्षक स्वेउपात करण्यात आली आहे. या बाईकच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची लांबी 2,260 मिमी, रुंदी – 890 मिमी, उंची – 1155 मिमी, सीटची उंची – 740 मिमी अशी आहे. तर बाईकचे एकूण वजन 241 इतके आहे. याला 1,500 mm चा व्हीलबेस आणि 135 mm चा ग्राउंड क्लीयरन्स देखील देण्यात आलेला आहे. क्रूझर म्हणून लांबचा प्रवास लक्षात घेऊन, याला 15.7 लीटर क्षमतेची इंधन टाकी Royal Enfield कंपनीकडून देण्यात आली आहे.
आकर्षक रंग : सध्याच्या Meteor मॉडेलच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली ही बाईक दोन प्रकारांमध्ये सादर केली जाणार आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड आणि टूररचा समावेश असणार आहे. या बाईक्सच्या रंगाबाबत सांगायचे झाले तर ही बाईक अॅस्ट्रल, सेलेस्टियल आणि इंटरस्टेलरच्या पेंट ग्रुपमध्ये सादर केली जाईल.
अशी असेल किंमत : (Royal Enfield) ने तयार केलेल्या या नवीन क्रूझर बाईकच्या लॉन्च तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, पुढील वर्षी ही युरोपियन बाजारात सादर केली जाऊ शकते. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेतही पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत हि बाईक दाखल होण्याची शक्यता आहे. या बाईकच्या किंमतीबद्दल सांगायचे तर 3.5 लाख ते 4 लाख रुपये इतकी किंमत या बाईकची असू सकते.
हे पण वाचा :
Royal Enfield Hunter 350 : दमदार फिचर्स आणि स्टाइलिश लूकसह लॉंच होणार hunter 350 बुलेट
Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?
Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग