गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना ‘धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडणे धोकादायक आहे’ अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र काही प्रवाशी या सूचनांकडे दुर्लक्ष करून नको ते धाडस करतात आणि आपला जीव गमावतात. अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली आहे. यामध्ये चुकीच्या रेल्वेमध्ये चढले म्हणून एका तरुणीनं रेल्वेतून उडी मारली (saved life of young woman). यावेळी ती तरुणी रेल्वेखाली चालली होती, मात्र त्यावेळी रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफच्या जवानाने या महिलेचे प्राण वाचवले (saved life of young woman) आहे. हि संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चुकीच्या रेल्वेत चढल्यामुळे महिलेने प्लॅटफॉर्मवर मारली उडी आणि…, Video आला समोर pic.twitter.com/dc313n79bq
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 18, 2022
काय घडले नेमके ?
गोंदिया रेल्वे स्थानकावर हि घटना घडली आहे. 16 ऑगस्ट रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावर नेहमी प्रमाणे समता एक्स्प्रेस आली होती. रात्री 11.55 मिनाटांनी समता एक्स्प्रेस सुटली. या रेल्वेमध्ये एक तरुणी घाईघाईमध्ये चढली. यानंतर काही वेळाने त्या तरुणीला लक्षात आले की, क्रमांक 12843 पुरी अहमदाबाद या रेल्वेमध्ये जायचे होते. मात्र आपण चुकीच्या एक्स्प्रेसमध्ये आलो आहोत. हि गोष्ट लक्षात आल्यानंतर या महिलेनं रेल्वेची गती कमी असल्याचा अंदाज घेऊन चालत्या रेल्वेमधून प्लॅटफॉर्म वर उडी मारली (saved life of young woman) मात्र ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळे ही तरुणी लगेच खाली पडली.
रेल्वेचा वेग अधिक असल्यामुळे ती खेचली गेली आणि तिचे हात आणि डोकं हे रेल्वे आणि प्लॅटफार्मच्या मध्ये जाणार होते एवढ्यात या प्लॅटफॉर्मवर आपले कर्तव्य बजावत असलेल्या आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांनी ते बघताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता झडप मारून या तरुणीला रेल्वेपासून दूर (saved life of young woman) केले. आरपीएफ जवान प्रमोद कुमार यांच्या प्रसंगावधानपणामुळे या तरुणीचा जीव (saved life of young woman) अगदी थोडक्यात बचावला आहे. प्रमोद कुमार यांच्या या धाडसी कार्याबद्दल त्यांचे सर्वानी कौतुक केले आहे. हि संपूर्ण थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???