पुणे प्रतिनिधी | भाजप वर नाराज असलेल्या घटक पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रामदास आठवलेंच्या पक्षाला जागा न सोडल्याने पुण्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणत सामुहिक राजीनामा दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया ( आठवले ) पक्षाचे पुण्याचे महेश शिंदे श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष, संगीता आठवले ( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला आघाडी,) हनुमंत साठे रिपाई ( मातंग आघाडी अध्यक्ष ) यांनी मिळून हा निर्णय आज जाहिर केला.
यावेळी श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष महाराष्ट्र महेश शिंदे म्हणाले सामान्य कार्यकर्ता दुखावला असून त्याच्यावर वेळोवेळी अन्याय होत आला आहे. त्याला न्याय देण्याचं काम आता आम्ही राज्यभरातील श्रमिक कामगारांना घेऊन करणार आहोत आणि भाजप चे ठीकठिकाणी असणारे उमेद्वार कसे पड़तील यावर आम्ही काम करणार आहोत.
संगीता आठवले यांनी सुद्धा भाजप सेना युतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरण्याचं राजकारण आम्ही हाणुन पाडणार आहोत म्हणत भाजप वर तोंडसुख घेतल. मातंग आघाडी चे हनुमंत साठे यांनी सुद्धा यावेळी भाजप वर नाराजी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकरांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा
एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…
प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर