जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले; RSS नेत्याच्या विधानाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील मतभेद उघड येत आहेत. यापूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला आरसा दाखवून देशाच्या वास्तवाची जाणीव करून दिली होती, त्यानंतर आता आरएसएस नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवरून जोरदार निशाणा साधला आहे. जे अहंकारी झाले, त्यांना प्रभू रामाने 241 वर रोखले असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केला आहे. संघाच्या नेत्याचेच असं विधान केल्याने खळबळ उडाली आहे. इंद्रेश कुमार यांनी जयपूरमध्ये रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभात हे वक्तव्य केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या इंद्रेश कुमार यांनी म्हंटल कि, प्रभू श्रीराम प्रत्येकाला न्याय देतात. रामाने बढाई मारणाऱ्या पक्षाला पूर्ण सत्ता दिली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल बघा. ज्यांनी रामाची पूजा केली ते अहंकारी झाले आणि त्यांचा पक्ष 241 पर्यंत कमी झाला. त्याला जे पूर्ण बहुमत मिळायला हवे होते, जी सत्ता मिळायला हवी होती, ती देवाने त्याच्या अहंकारापोटी रोखली. इंद्रेश कुमार यांनी आपल्या विधानांमध्ये कुठल्याही पक्षाच नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा रोख हा भाजपवर दिसून आला.

इंद्रेश कुमार यांनी यावेळी विरोधकांच्या INDIA आघाडीवर सुद्धा घणाघात केला. “ज्यांनी रामाचा विरोध केला, त्यांच्यापैकी कोणालाही सत्ता मिळाली नाही. सर्वजण मिळून क्रमांक २ वर राहिले. प्रभू रामाचा न्याय विचित्र नाही, तो खरा आणि आनंददायी आहे. ज्यांचा रामावर विश्वास नव्हता, त्या सर्वांना 234 वर थांबवण्यात आले. जे लोक रामाची पूजा करतात, त्यांनी विनम्र असलं पाहिजे आणि जे रामाला विरोध करतात, प्रभू राम स्वत: तो विषय हाताळतात” असं इंद्रेश कुमार म्हणाले.