पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आज शाहूपुरी येथे विजयादशमीचे संचलन केले. पालकमंत्री तसेच महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुमारे पाचशे स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. आज सकाळी पावणेआठ वाजता संचलनास सुरवात झाली. कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज या परिसरातून या संचालनालय सुरुवात झाली. शाहूपुरी परिसरातून शिस्तबद्ध रित्या हे संचलन पार पडले.

संचलनात फुलांनी सजवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमा होत्या. पुढे दोन तलवारधारक, त्यामागे भगवा ध्वजधारी घेऊन घोडेस्वार होता. त्यापाठोपाठ ड्रम आणि बिगुल पथक आणि शेवटी स्वंयसेवक होते. संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्या आणि फुलांची उधळण करण्यात आली.

संचलनामध्ये स्वंयसेवकांचे पाच विभाग केले होते. त्या त्या भागातील स्वंयसेवक संचलनात सामील झाले होते. दरम्यान यावेळी ,’दरवर्षीच्या संचलनाप्रमाणेच हे संचलन होते. या ठिकाणी मीही एक स्वयंसेवक म्हणूनच सहभागी झालो आहे’ अशी प्रतिक्रीया यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान यावेळी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी संचलनासाठी मोठी गर्दी केली होती.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment