पुणे | महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी रूबी हॉल क्लिनिक तर्फे ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्टिफाईड लाफ्टर ट्रेनर मकरंद टिल्लू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे सर्जिकल आँकोलॉजीचे संचालक डॉ.संजय देशमुख, रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ.भूषण झाडे व रूबी हॉल कॅन्सर सेंटरच्या असिस्टंट जनरल मॅनेजर शुभदा क्रुझ उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ.संजय देशमुख व डॉ.भूषण झाडे यांनी लवकर निदान आणि उपचार तसेच आहार याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला 50 पेक्षा अधिक ब्रेस्ट कॅन्सरमधून बचावलेल्या महिला उपस्थित होत्या.या महिलांकरिता खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तेहमी ग्रँट नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी नाटिका सादर केली. तसेच आर्ट ऑफ लाफींग या विषयावर मकरंद टिल्लू यांचे विशेष व्याख्यान पार पडले. या व्याख्यानादरम्यान त्यांनी उपस्थितांकडून लाफ्टर योगामधील व्यायामाचे प्रकार करून घेतले व निरोगी जीवनासाठी लाफ्टर योगाचे महत्त्व पटवून दिले.ते पुढे म्हणाले की, लोकं फक्त एकमेकांना सकारात्मक विचार करायला सांगतात, पण तो सकारात्मक विचार कसा करायचा हे सांगत नाहीत. सकारात्मक विचारांसाठी हसणे हा सर्वोत्तम उपाय आहे.