मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यपदावरून स्वतः पायउतार झालेल्या चित्रा वाघ यांच्या जागी पक्षाने त्यांच्याच तोडीचा चेहरा दिला आहे. पुणे महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीने महिला प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक केली आहे. त्यांच्या नेमणुकीने पुण्याच्या महिला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे.
आज पुण्यात प्रदेशाध्यक्ष आ. @Jayant_R_Patil, खा. @vandanahchavan यांच्या प्रमुख उपस्थितीत @NCPspeaks च्या महिला प्रदेशाध्यक्षपदी म्हणून सौ. रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली. रुपालीताईंचे हार्दिक अभिनंदन !!! pic.twitter.com/is399WN9ey
— NCP (@NCPspeaks) July 27, 2019
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदी निवड केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण देखील उपस्थित होत्या. पुणे मनपाच्या नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकीर्तीला सुरुवात केलेल्या रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या बांधणीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या त्या तरुण मुलींमध्ये आणि महिलांमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कर्तुत्वाला उत्तम वक्तृत्वाची देखील जोड मिळालेली आहे. राजकीय निपुण असल्यानेच त्यांना या पदी जाण्याची संधी मिळाली आहे.
पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसळ यांच्या विरोधात रुपाली चाकणकर यांना उमेदवारी मिळू शकते. त्याच प्रमाणे त्या स्वतः खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असल्याचे देखील समजते. मात्र पर्वती मतदारसंघातून राष्ट्रवादीला तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने पक्ष त्यांना तिथूनच उमेदवारी करण्यास सांगू शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?
चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश