हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मी कधीही फाजिल आत्मविश्वास ठेवलेला नाही. असा फाजिल आत्मविश्वास ठेवणाऱ्यांना इकडे अध्यक्ष तिकडे उपाध्यक्ष म्हणून काम करावे लागत आहे. बैलगाडी खाली चालणाऱ्या श्वानाला वाटतं माझ्यामुळे बैलगाडी चालते. तेव्हा ही भावना काढून टाकावी. कधीही मी कुणाच्या वैयक्तिक विषयावर घसरत नाही. आपण पक्ष सोडलाच कशामुळे हे जर माहिती असते. तर ज्याचे घरच काचेचे आहे, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्याचे काम करू नये, अशी टीका राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चित्राताई यांना लगावला.
रूपाली चाकणकर यांनी एक व्हिडीअो ट्विटवर टाकत भाजपाच्या महिला उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी पक्षात काम करत असताना लोकनेते शरद पवार यांनी चित्रा वाघ प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. आम्ही पक्षात कुटुंब म्हणून काम करत आलो आहोत. राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला पक्ष संघटना राज्यभर जोमाने वाढले आहे. मी कुणाच्या हाताखाली काम केले, वरचढ केले ही भावना ठेवलेली नाही.
बैलगाडी खाली चालणाऱ्या श्वानाला वाटतं माझ्यामुळेच बैलगाडी चालते..
(१/२) pic.twitter.com/DU01F07Kaw— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 14, 2021
आपल्या पतीवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे किंवा सामाजिक, राष्ट्रीय कारणांमुळे व पक्षीय मतभेद यामुळे त्यांना पक्ष सोडून भाजपामध्ये जावे लागले. राष्ट्रवादी पक्षात महिला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदावरून भाजपात उपाध्यक्ष पदावर काम करावे लागत असल्याने मानसिक ताण असल्याचे जाणवत असल्याचा टोलाही रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे.