ऋषी कपूर यांनी भारतीयांसाठी केलं होत ‘हे’ शेवटचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. भारतीय चित्रपटाला रोमँटिक चेहरा देणारा अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांना ओळखलं जातं. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती. ऋषी कपूर हे सोशल नेटवर्किंगवर खूप अ‍ॅक्टीव्ह् होते. ते ट्विटवरुन नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडींसंदर्भात व्यक्त होत असत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनायुद्ध्यांसाठी एक ट्विट केलं होतं.

कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला एकत्र जिंकायची आहे, असं कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. “वेगवेळी विचारसरणी आणि सामाजिक स्तरातील सर्व बंधू-भगिनींना मी आवाहन करतो की हिंसा करु नका, दगडफेक किंवा मारहाणीसारख्या घटना होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, मेडिकल, पोलीस हे त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला ही करोनाविरुद्धची लढाई एकत्र जिंकायची आहे. जय हिंद,” असं ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

देशामध्ये करोनासंदर्भात चिंता वाढू लागल्यापासून ऋषी कपूर यांनी अनेकदा ट्विट करुन त्यासंदर्भात आपले मत मांडले होते. अगदी देशात आणीबाणी लागू करण्यापासून ते कनिका कपूरप्रकरणापर्यंत त्यांनी ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment