हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना व्हायरल फिव्हरमुळे मुंबईच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयातून सुट्टी मिळाली होती. कपूर कुटुंबाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांची तब्बेत खालवल्यामुळं त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तत्पूर्वी ऋषी कपूर यांनी ट्विटरवर आपण घरी परतलो असून तब्येत ठीक असल्याचे सांगितलं होत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोनच दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांना दक्षिण मुंबईतील सर एच. एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात व्हायरल फिव्हरमुळे दाखल करण्यात आले होत. सध्या त्यांची तब्बेत ठीक असून काळजी करण्याची काहीच गरज नाही. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ऋषी कपूर यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना झालेला आजार पुन्हा बळावला असल्याची अटकळ लावली जात असतांना आपली तब्बेत ठीक असल्याचे ऋषी कपूर यांनी सोमवारी ट्विटरवर स्पष्टीकरण दिल होत.
I was running a slight fever and on investigation,Dr.s found a patch which could have lead to pneumonia,was detected and is being cured. People seem to have assumed a lot different. I put to rest all those stories and look forward to entertain and love you. I am now in Mumbai.
— Rishi Kapoor (@chintskap) February 4, 2020
दरम्यान, आपल्या वडिलांना भेटायला रणबीर कपूर रुग्णालयात पोहोचला होता. यावेळी रणबीर कपूरने रूग्णालयात जात असताना मास्क घातला होता. कोरोना विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत, बरेच जण स्वतःच्या संरक्षणासाठी मास्क वापरत आहेत. खासकरुन मुंबईत राहणारे लोक मास्कचा जास्त वापर करतात दिसत आहेत. बॉलीवूड कलाकारांना चित्रीकरणाच्या निमित्तानं बर्याचदा देशाबाहेर जावं लागतं. त्यामुळं खबरदारी म्ह्णून बरेच कलाकार मास्क लावून दिसत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.