हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु अनेक लोकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. त्याच दरम्यान तूर्तास रशिया कडून युद्ध बंदीची घोषणा करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे
युद्धाची परिस्थिती पाहता अनेक नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला यात अनेक परदेशी नागरिक हे युक्रेन मधेच अडकले आहेत त्याच पार्श्वभूमीवर रशियाच्या सरकारने तात्पुरता सिजफायर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलायं. यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि व्होल्नोवाखा सोडण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली आहे.
Russia declares ceasefire in Ukraine from 06:00 GMT (Greenwich Mean Time Zone) to open humanitarian corridors for civilians, reports Russia's media outlet Sputnik
— ANI (@ANI) March 5, 2022
युद्धविराम काळात रशियाकडून युक्रेनवर कोणताही हल्ला होणार नाही. तसेच या काळात युक्रेनकडूनही रशियावर हल्ला होणार नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारत, पाकिस्तान आणि चीनसह सर्वच देशातील नागरिकांना आपल्या देशात निर्भयपणे परतता येणार आहे.