येत्या १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरची लस बाजारात आणू; रशियन वैज्ञानिकांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को । जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशा वेळी रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे.येत्या १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया कोरोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं असं वक्तव्य रशियन अधिकारी आणि वैज्ञानिकांनी CNN शी बोलताना केलं आहे. मॉस्कोतल्या गामालेया इन्सिट्युटमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे.

गामालेया इन्सिट्युटचा वैज्ञानिकांचा दावा आहे की, सामान्य लोकांच्या वापरासाठी या लसीला १० ऑगस्टपर्यंत मंजुरी देऊ शकतो. मात्र, सर्वात आधी लस फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल असं रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोनाच्या लसींवर चाचणी सुरु आहे. काही देशांमध्ये लसींची चाचणी ही तिसऱ्या टप्प्यात आहे. तर रशियात दुसरा टप्पा अजून शिल्लक आहे. ३ ऑगस्टपर्यंत हा टप्पा पूर्ण करण्याचा संशोधकांचा मानस आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्याचं परीक्षण सुरु केलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनावरील लसीबाबत रशियाच्या सोवरन वेल्थ फंडचे किरील मित्रिव म्हणाले, ही ऐतिहासिक घटना आहे. ज्याप्रकारणे आम्ही अंतराळात उपग्रह स्फूटनिक सोडला होता, ही तशीच घटना आहे. स्फूटनिकबाबत ऐकून अमेरिकेचे लोक चकित झाले होते. त्याप्रकारे ही लस लॉन्च झाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा बसणार आहे. मात्र रशियाने आत्तापर्यंत लसीच्या चाचणीची कोणतीही माहिती जारी केलेली नाही. यामुळे या लसीच्या प्रभावाबाबत टिप्पणी करता येणार नाही. याशिवाय लस लवकरात लवकर बाजारात येण्यासाठी राजकीय दबाव असल्याची टीका होत आहे. यासोबत या लसीच्या अपूर्ण मानवी चाचणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment