हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला. त्यानंतर आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानि थेट इशाराच दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असे महत्वाचे विधान त्यांनी केले आहे.
रशियन सैन्याच्यावतीने युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करण्यात आले आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा सुरू होण्यापूर्वी रशियाने युक्रेनियन शहरांवर बॉम्बफेक करणे थांबवले पाहिजे, कारण या आठवड्यात वाटाघाटींच्या पहिल्या फेरीत फारशी प्रगती झाली नाही.
Russia will not allow Ukraine to acquire nuclear weapons – FM Sergey Lavrov pic.twitter.com/ux0FH57wMt
— RT (@RT_com) March 2, 2022
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील गेल्या सात दिवसांपासूनयुद्ध सुरु आहे. रशियाने त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेने जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अशात आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरे महायुद्ध हे अणवस्त्रांचे असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष याकडे लागले आहे.