नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपल्या आयुष्यातील एखादा चुकीचा निर्णय आपल्याला महागात पडू शकतो. काही वेळा या चुकीच्या निर्णयाची किंमत आपल्याला आपला जीव गमावून चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या बाबतीत घडला आहे. ग्रेटा वेडलर पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आलेली जेव्हा तिने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सायकोपॅथ म्हणजेच मनोरुग्ण म्हटलं होतं. ग्रेटा वेडलरनं पुतिन यांना सायकोपॅथ म्हटल्यानं ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं तिच्या मृत्य़ूशी काहीही कनेक्शन नाही. ग्रेटाच्या मृत्यूचे खरे कारण तिचा एक्स बॉयफ्रेंड होता. या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे मृत ग्रेटा वेडलरच्या एक्स बॉयफ्रेंडनेच तिची हत्या केली.
या आरोपी बॉयफ्रेंडचे नाव दिमित्री कोरोविन असे आहे. त्याने आपल्या गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या केली आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून गाडीच्या डिक्कीत ठेवून तो फिरत होता. आरोपी दिमित्री कोरोविन याने आपला गुन्हा मान्य करत सांगितलं की ग्रेटाचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवून गाडीने तो 300 मील दूर पोहोचला होता. इथेच त्याने तिचा मृतदेह गाडीसह सूटकेसमध्येच सोडला. आरोपी दिमित्री कोरोविन आणि मृत ग्रेटा वेडलर यांच्यात पैशावरून वाद झाला होता. याच वादातून आरोपी दिमित्रीने आपली प्रेयसी ग्रेटा हिची निर्घृणपणे हत्या केली. तिच्या या मृत्यूचे आणि पुतिन यांचं काहीही कनेक्शन नाही.
आरोपी कोरोविनने ग्रेटाच्या मृत्यूनंतर तिचं सोशल मीडिया पेज सतत मेन्टेन केलं, जेणेकरून तिच्या मृत्यूचा किंवा गायब असल्याचा संशय कोणाला येऊ नये. हे तोपर्यंत सुरूच राहिलं जोपर्यंत तिच्या एका युक्रेनियन ब्लॉगर असलेल्या फ्रेंडला संशय आला नाही. यानंतर त्या युक्रेनियन ब्लॉगरने आपल्या रशियन मित्राला याबद्दल माहिती दिली, यानंतर ग्रेटाचा तपास सुरू झाला. यानंतर आरोपी कोरोविनने आपणच ग्रेटा वेडलर हिची हत्या केली असल्याचे मान्य केले.