नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील वाढती लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात तयार होणाऱ्या कॅव्हॅक्सिन आणि कोविडशिल्ड या दोन्ही लसींबरोबरच भारतात 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणा मध्ये आता Sputnik V या रशियन लसीचा सुद्धा समावेश असणार आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाने जगातील पहिली लस तयार केली. रशियाने लसीचे नामकरण Sputnik V त्यांच्या पहिल्या उपग्रहावरून केले आहे. सोवियत युनियन ने 4 ऑक्टोबर 1957 रोजी जगातले पहिले उपग्रह स्पुटनिक प्रक्षेपित केला. शीतयुद्धाच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रह रशियाची एक मोठी उपलब्धी मानली जात होता. पुतीन यांनी गेल्यावर्षी म्हटलं होतं की ही अत्यंत प्रभावीपणे कार्य करते आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते सर्व आवश्यक चाचण्या लसीने उत्तीर्ण केल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. रशियातील करोना व्हायरस लस गमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने तयार केली आहे
Sputnik V 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेतील फायझर 90 टक्के प्रभावी दिसून आली आहे. देशातील कोवॅक्सिन आणि कॅव्हिडशील्ड या दोनच लस उपलब्ध आहेत. कोवॅक्सिन 81% प्रभावि आहे तर कॅव्हिडशील्डची कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत आहे. आता रशियन लस Sputnik V भारतातील एकमेव लस असेल जी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.
ही लस तयार करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार लसीची किंमत दहा डॉलरच्या खाली आहे जेणेकरून ही लस सातशे रूपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल. डॉक्टर रेड्डी यांच्या प्रयोगशाळेत भारतात Sputnik V लस विकसित करत आहे.