हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट (Cricket) हा खेळ आपल्या भारतात खूपच लोकप्रिय आहे. क्रिकेटला आपण एखाद्या धर्माप्रमाणे मानतो, क्रिकेटपटूंवर प्रेम करतो, इतकी क्रेझ आपल्या देशात आहे. इतर कोणत्याही खेळापेक्षा देशात क्रिकेटला जास्त महत्व असल्याने क्रिकेटपटूंना सुद्धा या गोष्टीचा मोठा फायदा होतो. यामुळे देशातील क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहेत. सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीपर्यंत सर्वच क्रिकेटर मालामाल आहेत, आणि यामुळे सरकारकडे त्याना टॅक्स सुद्धा भरावा लागतो. आज आपण जाणून घेऊयात कि असे कोणकोणते क्रिकेटर आहेत जे सार्वधिक टॅक्स सरकारी तिजोरीचे जमा करत आहेत आणि त्यांची एकूण कमाई किती आहे.
फॉर्च्यून इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) होता. आपल्या दमदार खेळीने क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला कोहली क्रिकेट शिवाय जाहिरातींमधूनही बक्कळ पैसा कमवतो, त्याचवेळी विराटने यंदा तब्बल 66 कोटी रुपयांचा वार्षिक कर भरला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिह धोनी (MS Dhoni)… आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेऊन बरीच वर्ष झाली असली तरी आयपीएल आणि अन्य जाहिराती तसेच काही गुंतवणुकीच्या माध्यमातून धोनी सुद्धा मालामाल आहे. धोनीने विराट नंतर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे
विराट आणि धोनी नंतर टॅक्स भरण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) … देशात अजूनही सचिनचे वलय कायम आहे. १० वर्षांपासून सचिन क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो. तसेच अनेक ठिकाणी सचिनने गुंतवणूक सुद्धा केली आहे. रिपोर्टनुसार आपल्या एकूण कमाईमधून सचिनने यंदा २८ कोटींचा टॅक्स भरला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सुद्धा टॅक्स भरण्याच्या बाबतीत मागे नाहीत. जाहिराती आणि आयपीएल मधून सौरव गांगुलीला पैसे मिळतात. यंदा गांगुलीने २३ कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे तर खेळाडू हार्दिक पांड्याने १३ कोटी रुपयांचा कर भरला आहे.